टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी यांनी ट्वीटरमध्ये 9 टक्के शेअर खरेदी केले असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता मस्क ट्वीटर कंपनी खरेदी करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे मस्क यांनी दिलेल्या ऑफरनंतर ट्वीटरचे शेअर दर वधारल्याचेही दिसून आले. (Billionaire entrepreneur Elon Musk took aim at Twitter takeover offer)
ट्वीटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना मस्क यांनी पत्र लिहिले. पत्रात मस्क म्हणतात, “कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मला काही गोष्टी लक्षात आल्या. सध्याच्या परिस्थितीत जसे ट्वीटरचे काम सुरु आहे, त्यात कंपनीची भरभराट अशक्य आहे. त्यामुळे कंपनीमध्ये मोठे बदल होणे आवश्यक आहे.” ट्वीटरमध्ये प्रचंड क्षमता असून त्याला वाव देण्याची गरज असल्याचेही मस्क यांनी पत्रात म्हटले.
ट्वीटर कंपनीसाठी माझ्याकडून ही चांगली ऑफर आहे. कदाचित ही शेवटची ऑफर असावी. सोबतच कंपनीने या ऑफरवर गांभीर्याने विचार केला नाही तर मी ट्वीटरमधील माझ्या गुंतवणुकीबाबतही फेरविचार करणार, असा स्पष्ट इशाराही मस्क यांनी पत्रातून दिलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.