लंडन : ब्रिटन माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचे उमदेवार ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्या उमेदवारीविरोधात गुप्त मोहीम सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मोहिमेला 'Back Anyone But Rishi' असे नाव देण्यात आले आहे. जॉन्सन यांनी पंतप्रधानपद गमावण्यासाठी सुनक यांना दोष दिला. जॉन्सन यांनी जाहीरपणे कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नसला तरी पेनी मॉर्डंट किंवा लिझ ट्रस यांच्या उमेदवारीवर त्यांचा आक्षेप नाही. (Rushi Sunak News in Marathi)
बोरिस यांच्या राजीनाम्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 30 जून रोजी ख्रिस पिंचर यांची डेप्युटी चीफ व्हिप पदावर नियुक्ती करणे हे होतं. पिंचर एका सेक्स स्कँडलमध्ये सामील होते हे माहित असूनही जॉन्सनने त्यांची नियुक्ती केली होती. याशिवाय प्रिन्स फिलिपच्या अंत्यसंस्काराच्या आधीही पार्टी करणे आणि लॉकडाऊनमधील दारू पार्टीचे फोटो समोर आल्यामुळे बोरिस यांची फजीती झाली होती. प्रिन्सच्या फिलीप यांच्या अंत्यसंस्काराच्या आधी पार्टी केल्याबद्दल बोरीस यांनी माफीही मागितली होती.
दरम्यान, नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बोरीस यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांच्या पाठिंब्यानंतर भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचे टॉप-2 मध्ये स्थान जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी, टॉम टुजेंट, पेनी मॉर्डंट, कॅमी बॅडेनोच आणि लिझ ट्रस यांच्यात सनकसह टेलिव्हिजन वादविवाद झाला. यातही सुनकचे पारडे जड होते. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या सुमारे 2 लाख मतदारांची मने जिंकणे हे सुनक यांच्यापुढे मोठे आव्हान असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.