नवी दिल्ली- दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. दोन्ही देशांनी दावा केलाय की त्यांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केलाय. पाकिस्तानने म्हटलं होतं की इराणने त्यांच्या सार्वभौमत्वावर हल्ला केलाय. त्यामुळे त्यांना प्रत्युत्तराचा पूर्ण अधिकार आहे. इराणने दावा केलाय की त्याने जैश अल-अदल नावाच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय.
दोन्ही मुस्लीम देश आहेत. इस्लामिक देशांनी एकत्र येण्याचं दोन्ही राष्ट्र अधूनमधून बोलत असतात. इस्राइलविरोधात एकत्र येण्याचंही त्यांचं आवाहन असतं. मात्र, सध्या दोन्ही देशात संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि इराणमध्ये हा संघर्ष का सुरु झालाय? हे आपण जाणून घेऊया.
इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत अंतर्गत कलह आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये बलुच लोकांची संख्या जास्त आहे. दुसरीकडे इराणच्या सुस्तानमध्ये देखील बलुच लोक लक्षणीय प्रमाणात राहतात. बलुच लोकांची संस्कृती इराणसारखीच असल्याचं सांगितलं जातं. बलुच लोकांवर पाकिस्तान आणि इराणमध्ये देखील अत्याचार होत असात. जैश अल-अदल सारख्या काही संघटना बलुचिस्तान आणि सिस्तान या प्रांताना मिळून एक नवा देश निर्माण करण्याला पाठिंबा देतात.
बलुच लोकांचा वेगळा देश असावा आणि त्यांना वेगळी ओळख मिळावी या मुद्द्यावरुन हा वाद आहे. पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीसारख्या काही संघटना देखील वेगळ्या बलुच देशासाठी लढा देत आहेत. ही संघटना पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात सशस्त्र विद्रोह करत आहे. तर इराणमध्ये जैश अल-फदल विद्रोह करत आहे. इराणचा दावा आहे की, जैश अल फदलने पाकिस्तानमध्ये तळ बनवला आहे. त्यामुळे इराण पाकिस्तानच्या सीमा भागात हल्ले करत असते.
इराणचा दावा आहे की, जैश अल फदल संघटनेच्या तळांवरच पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यात आला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा दावा आहे की, बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन आहे. त्यामुळे बलुच लोकांच्या मुद्द्यावरुन दोन्ही देश एकमेकांसमोर आलेत. याशिवाय इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे, तर पाकिस्तान हा सुन्नी आहे. यावरुनही त्यांच्यात वाद आहेत. इराणचा असा दावा आहे की पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे.
जैश अल-फदलची स्थापना २०१२ मध्ये झाली होती. तेव्हापासून या संघटनेने इराणला लक्ष्य केले आहे. या संघटनेवर इराण, जपान, न्यूझीलंड आणि अमेरिका या देशांनी बंदी घातलीये. जैश अल-फदलचा प्रमुख सलाहुद्दीन फारुकी असल्याचं सांगितलं जातं. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.