मुंबई : एका ६५ वर्षीय कोट्यधीश व्यक्तीने एका १६ वर्षांच्या मुलीशी लग्न केले आहे. ही व्यक्ती म्हणजे ब्राझीलचे महापौर हिसाम हुसैन देहेनी आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.
या मुलीसाठी हिसाम यांनी आपली नोकरीही सोडली आहे. ही मुलगी चाइल्ड ब्युटी क्वीन कॉएने रोड कॅमार्गो आहे. लग्नाच्या ४ दिवस आधीच ती १६ वर्षांची झाली आहे. (brazil Mayor Hissam Hussein Dehaini married with 16 year old girl)
एका रिपोर्टनुसार हिसाम हे १४ दशलक्ष ब्राझिलियन रियाल एवढ्या संपत्तीचे मालक आहेत. लग्न झालं तेव्हा ते पराना राज्यातील अराकुरिया शहराच्या महापौरपदी दुसऱ्यांदा कार्यरत होते.
कॉएनेशी लग्न केल्यानंतर त्यांना सिद्दानिया राजकीय पक्षाचा राजीनामा द्यावा लागला आहे. लग्न करण्याआधी हिसाम यांनी मुलीच्या आईला आणि मावशीला चांगल्या पगाराची नोकरी दिली आहे.
मुलीच्या ३६ वर्षीय आईला सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयातील नगर सचिव म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर पगारात १५०० डॉलरचा फायदा झाला. तसेच मावशीची नियुक्ती महासचिव म्हणून करण्यात आली.
या नोकऱ्या देण्यासाठी महापौरांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे हे उघड झाल्यानंतर त्या दोघींचीही त्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली.
हिसाम यांचं हे पहिलं लग्न नाही. याआधी ५ वेळा त्यांचं लग्न झालं आहे. त्यांचं पहिलं लग्न १९८० साली झालं होतं. ते १६ मुलांचे बाप आहेत.
२००० साली एका ड्रग्ज तस्करी प्रकरणात हिसाम यांना अटक झाली होती. त्यानंतर ते १००हून अधिक दिवस तुरुंगात राहिले होते.
ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीने आईवडिलांच्या परवानगीने विवाह करणे कायदेशीर आहे. त्यामुळे हे लग्न होऊ शकले व हिसाम यांची नवी पत्नी अजूनही शाळेत जाते.
विशेष म्हणजे ही मुलगी या लग्नाने खूष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.