Brazil plane crash : धक्कादायक! ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं,सर्वांचा दुर्दैवी मृत्यू; Video Viral

Brazil plane crash - ब्राझीलमधील विन्हेडो येथे ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळले. सोशल मीडियावर विमान कोसळत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि ब्राझीलमधील मीडियानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Brazil plane crash horror
Brazil plane crash horroresakal
Updated on

Brazil plane crash - ब्राझीलमधील विन्हेडो येथे ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळले. येथील स्थानिक टीव्ही स्टेशन ग्लोबोन्यूजच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी Voepass Linhas Aéreas चे Flight 2283 हे विमान परानामधील कॅस्केव्हल ते साओ पाउलोमधील ग्वारुलहोसकडे जात होते. हा अपघात विन्हेदो शहरात झाला असल्याच्या वृत्ताला स्थानिक अग्निशमन दलाने दुजोरा दिला आहे. पण, त्यांनी अधिक तपशील दिलेला नाही.

कॅस्केव्हल ते ग्वारुलहोस विमानतळाकडे जाणाऱ्या या विमानात ५८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. एअरलाइनने सांगितले की त्यांनी बाधितांना मदत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपघाताचे कारण किंवा विमानातील लोकांची स्थिती यासंबंधीचे तपशील अद्याप मिळालेले नाही.

"VOEPASS ने प्रवाशांना पाठिंबा देण्यासाठी सर्व उपाय केले आहेत. हा अपघात कसा झाला किंवा विमानातील लोकांची सद्यस्थिती काय आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही,” असे निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.