Brazil’s- ब्राझीलची राजधानी रिओ डी जानेरिओमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर बँकेमध्ये आणलं होतं. कर्ज मंजूर व्हावं यासाठी मृत व्यक्तीकरवी स्वाक्षरी करुन घेण्यासाठी महिला प्रयत्न करत होती. महिला मृत व्यक्तीची पुतणी असल्याचं कळतंय. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी महिलेच्या निर्दयीपणावर टीका केली आहे.
महिला मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहोचली. व्हिलचेअरवर बसलेला व्यक्ती कोणतीही हालचाल न करता बसलेला असतो. त्याची मान देखील पडलेली असते. अशावेळी महिला त्याची मान सरळ करते, त्याच्या हातात पेन देते आणि समोर असलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करवून घेण्याचा प्रयत्न करते. मात्र, व्यक्ती मृत झाला असल्याने तिला प्रतिसाद मिळत नाही. (Brazilian Woman Brings Dead Man On Wheelchair To Bank To Get His Signature On Loan Form video)
बँकेतील कर्मचाऱ्यांना संशय येतो. यावेळी बँक कर्मचाऱ्यांकडून पोलिसांना फोन केला गेला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांना देखील पाचारण करण्यात आलं. डॉक्टरांनी व्हिलचेअरवर बसलेल्या व्यक्तीची तपासणी केली. त्याचा काही तासांपूर्वी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीचे नाव पॉल रॉबर्टो ब्रागा (वय ६८) आहे. महिलेचे नाव इरिका डीसुझा असल्याचं कळतंय. ती मृत व्यक्तीची पुतणी असून केअरटेकर म्हणून ती काम करायची.
बँक कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी सदर प्रकाराचा व्हिडिओ शूट केला होता. महिलेला काकाच्या बँक खात्यातून कर्ज मंजूर करुन घ्यायचे होते. मृत व्यक्ती हा पेंशनर होता. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी महिला धडपडत होती. बँक कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तीबाबत विचारणा केली, पण महिलेने उडवाउडवीचे उत्तरं दिली. माझं डोकं खाऊ नको, गप स्वाक्षरी कर असं ती मृत व्यक्तीला म्हणत होती.
सदर घटना ही धक्कादायकच म्हणावी लागेल. कारण, स्वार्थासाठी महिलेने चक्क मृत व्यक्तीला बँकेमध्ये आणले. या घटनेमुळे लोकांनी महिलेवर आगपाखड केली आहे. तू खरी मृत आहेस असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला बोल लावले आहेत. दरम्यान, अशाच प्रकारची घटना आयर्लंडमध्ये घडली होती. पेंशन मिळावी यासाठी एका व्यक्तीने एका मृत व्यक्तीला जीवंत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. (Viral Video)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.