BRICS Summit: PM मोदींच्या 'या' कृतीमुळं तुम्हालाही वाटेल अभिमान; काय घडलंय नेमकं?, पाहा व्हिडिओ

जोहान्सबर्ग इथं ब्रिक्स समिटदरम्यान ही घटना घडली आहे.
PM Modi_BRICS Summit in Johannesburg
PM Modi_BRICS Summit in Johannesburg
Updated on

BRICS Summit in Johannesburg : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी (BRICS Summit) सध्या जोहान्सबर्गमध्ये आहेत. याच ठिकाणाहून ते चांद्रयान ३ च्या लँडिंगचा सोहळा लाईव्ह पाहणार आहेत. देशासाठी हा सोहळा अभिमानाचा क्षण असणार आहे.

पण याचदरम्यान ब्रिक्स समिट दरम्यान PM मोदींच्या एका कृतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मोदींनी केलेली ही कृती पाहून तुम्हालाही देशाचा अभिमान वाटेल. (BRICS Summit PM Modi action will make you proud What really happened watch video)

PM Modi_BRICS Summit in Johannesburg
New Education Policy : वर्षात दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा; 11वी, 12वीत शिकाव्या लागणार दोन भाषा

नेमकं काय घडलं?

जोहान्सबर्गमध्ये सध्या ब्रिक्स परिसद सुरु आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्गच्या दौऱ्यावर आहेत. परिषदेची बैठक झाल्यानंतर विविध देशांच्या प्रमुखांचा ग्रुप फोटो काढतेवेळी मोदी स्टेजवर गेले असताना तिथं छोट्या आकारातील भारताचा राष्ट्रध्वज स्टेजवर पडल्याचं त्यांना दिसलं. याकडं लक्ष जाताचं त्यांनी तो जमिनीवर पडलेल्या राष्ट्रध्वज उचलला आणि आपल्या कोटाच्या खिशात ठेवला. (Latest Marathi News)

PM Modi_BRICS Summit in Johannesburg
Share Market Closing: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये 213 अंकांची वाढ, कोणत्या कंपन्यांनी केले मालामाल?

इतरही अनेक देशांचे राष्ट्रध्वजही स्टेजवर पडले होते. यावेळी मोदींसोबत तिथं दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा हे देखील फोटोसाठी जात असताना त्यांनाही त्यांच्या देशाचा झेंडा जमिनीवर पडलेला दिसला. (Marathi Tajya Batmya)

मोदींची कृती पाहिल्यानंतर त्यांनीही हा झेंडा आपल्या हातानं उचलला त्यानंतर समोरुन एका मदतनीसानं तो झेंडा आपल्याकडं देण्याची विनंती पंतप्रधान मोदींना केली पण त्यांनी तो झेंडा आपल्याच खिशात ठेवला.

व्हिडिओवर अनेक कमेंट्स

मोदींच्या या कृतीचा व्हिडिओ पीटीआयनं ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या कृतीचं कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदींकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, असंही एकानं म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()