राजा चार्ल्स-III यांच्या राज्याभिषेकासाठी खास 'सेंट एडवर्ड क्राउन'; वजन 2.23 किलो

king charles
king charles
Updated on

लंडन - ब्रिटनच्या १७ व्या शतकातील "सेंट एडवर्ड्स क्राउन"ला क्राउन ज्वेल्सचे राजे चार्ल्स-III यांच्या राज्याभिषेकासाठी उजळून घेण्यात येणार आहे. बकिंगहॅम पॅलेसने शनिवारी याबाबत माहिती दिली. बकिंगहॅम पॅलेसने म्हटले की, पुढील वर्षी ६ मे रोजी वेस्टमिन्स्टर अ ॅबी येथे चार्ल्स-III यांचा राज्याभिषेक होणार आहे.

king charles
NASA Orion Spacecraft : ओरायनचा पृथ्वीकडील प्रवास सुरू

माणिक, नीलमणी, गार्नेट, टोपाझ आणि टूरमॅलिन यांनी सजलेला सोन्याच्या (सेंट एडवर्ड्स क्राउन) मुकुटाला उजळून घेण्यात येत आहे. त्यामुळे हे मुकूट संग्रहालयातून काढून ठेवण्यात आल्याचं बकिंगहॅम पॅलेसने म्हटलं. लंडनच्या टॉवरमध्ये असलेल्या सेंट एडवर्ड्स क्राउनला पाहण्यासाठी दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोक भेट देतात. संग्रहालयात एरमिन बँडसह जांभळ्या रंगाची मखमली टोपी आहे. ही टोपी ३० सेंमी.पेक्षा जास्त (एक फूट) लांब व खूप जड असते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी १९५३ मध्ये राज्याभिषेकाच्या वेळी ही टोपी परिधान केली होती. ७४ वर्षीय चार्ल्स-III यांना त्यांची पत्नी क्वीन्स कॉन्सर्ट कॅमिला यांच्यासोबत मुकुट घालण्यात येणार आहे.

king charles
Satara : महाराष्ट्रातील १६ आमदारांना निलंबीत करावेच लागेल ;पृथ्वीराज चव्हाण

या सोहळ्यानंतर ८ मे रोजी राष्ट्रीय सुट्टी असेल. सेंट एडवर्ड्स क्राउन १६६१ मध्ये राजा चार्ल्स दुसरा यांच्यासाठी तयार करण्यात आला होता. शेकडो वर्षांनंतर हा मुकुट केवळ राज्याभिषेक मिरवणुकांमध्येच नेला जात होता. त्याच कारण म्हणजे हा मुकुट जड होता. राजा जॉर्ज-IV याच्या राज्याभिषेकासाठी ते हलके व्हावे म्हणून १९११ मध्ये त्यात बदल करण्यात आला होता. परंतु तरीही त्याचे वजन २.२३ किलोग्रॅम (सुमारे पाच पौंड) आहे.

दरम्यान चार्ल्स-III हे राज्याभिषेकाच्या वेळीच हा मुकूट परिधान करणार आहे. जेव्हा ते वेस्टमिन्स्टर अॅबी सोडतात, तेव्हा चार्ल्स-III अधिक आधुनिक इंपीरियल स्टेट क्राउन परिधान करतील, ज्याचा वापर संसदेच्या उद्घाटनासारख्या प्रसंगी देखील करण्यात येतो. २० हजारहून अधिक हिऱ्यांसह इम्पीरियल स्टेट क्राउनची निर्मिती १९३७ मध्ये एलिझाबेथ द्वितीयचे वडील राजा जॉर्ज यांच्या राज्याभिषेकासाठी करण्यात आली होती.

हेही वाचा Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.