ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनलेल्या ऋषी सुनक यांच्या भारतीय कनेक्शनची बरीच चर्चा आहे.
Britain New PM Rishi Sunak : ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनलेल्या ऋषी सुनक यांच्या भारतीय कनेक्शनची बरीच चर्चा आहे. आता आणखी एक नवी माहिती समोर आलीय. फार कमी लोकांना माहित असेल की, ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांनी 7 वर्षांपूर्वी याची भविष्यवाणी केली होती.
कॅमेरून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Narendra Modi) झालेल्या चर्चेत म्हटलं होतं की, लवकरच भारतीय वंशाची व्यक्ती डाउनिंग स्ट्रीटवर पोहोचेल. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाला डाउनिंग स्ट्रीट असं म्हणतात. आता ही भविष्यवाणी खरी ठरली असून ऋषी सुनक यांना ही संधी मिळालीय. तेच ऋषी सुनक जे दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लिझ ट्रस यांच्याकडून पराभूत झाले होते.
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनला गेले होते, तेव्हा त्यांनी वेम्बली स्टेडियमवर (Wembley Stadium) भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनही सहभागी झाले होते. तेव्हा कॅमेरून यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं की, तो दिवस फार दूर नाही, जेव्हा ब्रिटनचा पंतप्रधानही भारतीय असेल, असं म्हटलं होतं.
ऋषी सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्यांचं वय केवळ 42 वर्षे आहे. त्यांचे आजी-आजोबा अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवासी होते. त्यांचे आजोबा प्रथम नैरोबी इथं स्थायिक झाले आणि तेथून ते ब्रिटनमध्ये पोहोचले. ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करताना अनेक नेत्यांची हकालपट्टी केलीय. याशिवाय त्यांनी देशवासीयांना आगामी काळात कठीण निर्णयांसाठी तयार राहण्यास सांगितलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.