विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सकारात्मक

भारतानं लंडनच्या कोर्टात चांगली बाजू मांडली
vijay mallya
vijay mallya
Updated on

लंडन : फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला परत आणण्यासाठी भारताने येथील न्यायालयात अत्यंत चांगली बाजू मांडली असून ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली आहे. (Britain positive for Mallya extradition says Harshvardhan Shrungala aau85)

vijay mallya
राज्यातील पूरबळींची संख्या १४९ वर; किमान १०० जण बेपत्ता

हर्षवर्धन श्रृंगला हे दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांची आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच, दोन देशांमधील संबंध दृढ करण्यासाठीच्या ‘रोडमॅप-२०३०’बाबतही त्यांनी चर्चा केली. तसेच, भारतात आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेल्या आरोपींच्या प्रत्यार्पणाचाही मुद्दा चर्चेत उपस्थित झाला. मल्ल्याच्या हस्तांतराबाबतची प्रक्रिया सुरु आहे.

vijay mallya
तळीये दुर्घटना: ग्रामस्थांच्या विनंतीनंतर प्रशासनानं थांबवली बचाव मोहिम

मल्ल्याने भारतात मोठा गैरव्यवहार केल्याचे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना मान्य असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी ते सकारात्मक पद्धतीने प्रयत्न करत आहेत, असे श्रृंगला यांनी सांगितले. ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तालयाकडूनही या प्रकरणी ब्रिटन सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.