Queen Elizabeth II Died
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. एलिझाबेथ यांना वयामुळे प्रवासास मर्यादा येत असल्यानेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांना बाल्मोराल कॅसल येथे बोलावून घेत त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपविली होती.
बकिंगहॅम पॅलेसने (Buckingham Palace) दिलेल्या माहितीनुसार राणी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आरोग्याच्या अनेक समस्यांमधून बऱ्या झाल्या होत्या. परंतु, त्यांना चालणे आणि उभे राहण्यात अडचणी येत होत्या. त्यातच गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं होतं. विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर राणी वरिष्ठ राजकीय सल्लागारांसह पूर्वनियोजित बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
राणी एलिझाबेथ या स्कॉटलंडमधील त्यांच्या बाल्मोराल कॅसल येथे राहत होत्या. वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. गुरुवारी त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर एलिझाबेथ यांचे पुत्र युवराज चार्ल्स, त्यांच्या पत्नी कॅमिला, नातू राजपुत्र विल्यम हे सर्व बाल्मारोल येथे गेले होते. अखेर गुरुवारी रात्री बकिंगहॅम पॅलेसने राणीचं निधन जाहीर केले.
सर्वाधिक काळ युकेच्या राजगादीवर विराजमान असलेली व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय. राजे जॉर्ज सहावे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. १९३६ मध्ये आठवे एडवर्ड (ड्यूक ऑफ विंझर) यांनी राजत्याग केल्याने जॉर्ज सहावे यांना राजगादी मिळाली. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी सहावे जॉर्ज यांचे निधन झाले. यानंतर एलिझाबेथ या गादीवर येणाऱ्या सहाव्या स्त्री सम्राज्ञी ठरल्या. २० नोव्हेंबर १९४७ मध्ये एलिझाबेथ यांचा विवाह युवराज फिलीप यांच्यासोबत झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.