इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचे निकटवर्तीय आणि उपपंतप्रधान डोमिनिक राब (Dominic Raab) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ब्रिटीश सरकारच्या (British Govt) विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ते दादागिरी करायचे, असा आरोप आहे.
गुरुवारी विविध कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्याविरुद्ध काही सदस्यांनी धमकावल्याची रितसर तक्रार केली आहे. सुनक यांना याप्रकरणी स्वतंत्र अहवाल सादर करण्यात आला आहे.
न्याय मंत्रालय आणि व्हाइटहॉलच्या अन्य विभागानं राब यांनी धमकवल्याचा आरोप केलाय. यानंतर डोमिनिक राब यांनी न्याय सचिव आणि उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. कंजर्हेटिव्ह पक्षाचे संसद सदस्यांवर लोकांसोबत गैरवर्तवणूक केल्याचे आरोप होत होते.
याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. यापूर्वी सुनक त्यांच्या पत्नी अक्षता मुर्ती यांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याने चर्चेत होते. आता राब यांचा राजीनामा सुनक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, राब यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.