भारतीय वंशाच्या खासदाराला निष्ठेचं मिळालं फळ, ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी Suella Braverman यांची वर्णी

सुएला याआधी पंतप्रधानपदाच्या दावेदार होत्या; पण निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या.
Liz Truss Suella Braverman Britain
Liz Truss Suella Braverman Britainesakal
Updated on
Summary

सुएला याआधी पंतप्रधानपदाच्या दावेदार होत्या; पण निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या.

Suella Braverman : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस (British PM Liz Truss) यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटिश खासदार सुएला ब्रेव्हरमन (British MP Suella Braverman of Indian Origin) यांची देशाच्या नव्या गृहमंत्रीपदी नियुक्ती केलीय.

सुएला याआधीही पंतप्रधानपदाच्या दावेदार होत्या; पण निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या. 42 वर्षीय सुएला यांना कॅबिनेट मंत्री म्हणून केवळ दोन वर्षांचा अनुभव आहे. परंतु, गेल्या सात वर्षांपासून त्या खासदार आहेत. त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Liz Truss Suella Braverman Britain
'लव्ह जिहाद'च्या कचाट्यात कुणी सापडलं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क करा : नवनीत राणा

सुएला ब्रेव्हरमन ह्या फेअरहाइमच्या खासदार आहेत. यापूर्वी त्या अ‍ॅटर्नी जनरल पदावर होत्या. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत त्यांनी ऋषी सुनक यांच्याऐवजी लिझ ट्रस यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळं त्यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागल्याचं बोललं जातंय. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांची निवड झाल्यानंतर, काही तासांतच प्रिती पटेल यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

Liz Truss Suella Braverman Britain
Delhi : भाजपला रोखण्यासाठी नितीश कुमारांची मोठी खेळी; राहुल गांधींनंतर येचुरींची घेतली भेट

निवडणुकीदरम्यान लिझ ट्रस यांना पाठिंबा देताना ब्रेव्हरमन म्हणाल्या, "लिझ आता पंतप्रधान होण्यासाठी तयार आहेत. त्यांना हे काम शिकण्याची गरज नाही." ब्रिटनच्या नवीन गृहसचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर सुएला यांनी ट्विट केलंय की, “गृहमंत्री म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मी लिझ ट्रस यांची अत्यंत आभारी आहे. यापुढं गृहमंत्री म्हणून देशाची सेवा करणार आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

Liz Truss Suella Braverman Britain
Umesh Katti : भाजपनं गमावला आणखी एक मंत्री; उमेश कत्तींचं Heart Attack ने निधन

सुएला ब्रेव्हरमन या पूर्वी शिक्षण निवडणूक समितीवर होत्या. परंतु, नंतर काही कारणांमुळं त्यांनी 2018 मध्ये पदाचा राजीनामा दिला. फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन यांनी त्यांची अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली. ब्रेव्हरमन ह्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. त्या नियमितपणे लंडन बुद्धिस्ट सेंटरला भेट देत असतात. भगवान बुद्धांच्या वचनांशी संबंधित धम्माबाबत त्यांनी संसदेत शपथही घेतलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.