लंडन: दोन दशकानंतर अफगाणिस्तानवर (Afganistan) वर्चस्व मिळवणाऱ्या तालिबानला (Taliban) चीन-पाकिस्तान (china-pakistan) या देशांनी आधीच पाठिंबा दिला आहे. रशियानेही तालिबानबाबत अनुकूल भूमिका घेतली आहे. भविष्यात या यादीमध्ये ब्रिटनचाही (Britain) समावेश होऊ शकतो. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी थेट तालिबानला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केलेली नाही. पण भविष्यात गरज पडली, तर तालिबानसोबत काम करण्यास अनुकूलता दाखवली आहे.
'गरज पडली, तर आम्ही तालिबानसोबत काम करु' असे बोरिस जॉन्सन शुक्रवारी म्हणाले. अफगाणिस्तानचा विषय हाताळण्यावरुन ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांवर टीका सुरु आहे. त्यांचाही जॉन्सन यांनी बचाव केला. "अफगाणिस्तानला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, त्यावर मार्ग शोधण्यासाठी आमचे राजकीय आणि कुटनितीक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. गरज पडली, तर आम्ही त्यांच्यासोबत नक्कीच काम करु" असे जॉन्सन म्हणाले.
शनिवारपासून आतापर्यंत १,६१५ जणांना अफगाणिस्तानातून सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे, अशी माहिती ब्रिटन सरकारने दिली. यात ३९९ ब्रिटिश नागरिक आहेत. ३२० दूतावासातील कर्मचारी आणि ४०२ अफगाणि नागरिक आहेत. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या संदर्भात जॉन्सन यांना तुम्हाला अजूनही त्यांच्यावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, डॉमिनिक यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे उत्तर दिले.
पंतप्रधान मोदींचं सूचक विधान
अफगाणिस्तानात तालिबान राज (Afganistan taliban) येणार हे स्पष्ट झालय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी अत्यंत सूचक विधान केलय. "विनाशकारी शक्ती आणि लोक, जे दहशतीच्या विचाराने साम्राज्य उभं करण्याचा विचार करतात, त्यांचं काही वेळसाठी वर्चस्व निर्माण होतं. पण त्यांचं अस्तित्व कायमस्वरुपी नसतं. ते मानवतेचा आवाज दडपू शकत नाही" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमात बोलत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.