ब्रिटिश यूट्यूबर माइल्स रूटलेजने (Miles Routledge) भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याने सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ माजला आहे. रूटलेजने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मीम व्हिडिओ शेअर केला, ज्यात अण्वस्त्र मिसाईल्स अमेरिकेतील लपवलेल्या ठिकाणांमधून एकामागून एक बाहेर पडताना दाखवले आहेत आणि त्यातून विश्वयुद्धाची शक्यता दर्शवली आहे.
रूटलेजने या व्हिडिओला शेअर करताना म्हटले, "जेव्हा मी इंग्लंडचा पंतप्रधान होईन, तेव्हा मी अण्वस्त्र साइलो उघडेन आणि ब्रिटिश हितांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही परकीय शक्तीला नेस्तनाबूद करण्यासाठी तयार असेन." यानंतर त्याने आणखी एक वादग्रस्त टिप्पणी करत भारतातही असेच काही करण्याचा इशारा दिला.
विवाद आणि त्याचे परिणाम
रूटलेजच्या या पोस्टनंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. अनेक भारतीयांनी त्याच्या विधानांचा तीव्र निषेध केला, ज्यामुळे रूटलेजने त्यांच्यावर जातीय टिप्पणी करत त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली.
त्याने लिहिले की, "भारतीयांनी मला शोधून काढण्याची धमकी दिली आहे," आणि त्याने त्याच्या लोकेशन आणि कपड्यांचे वर्णन करून ट्रोल्सना आव्हान दिले की ते त्याला शोधून दाखवावेत. त्याच्या या पोस्टला 50 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.
यानंतर, रूटलेजने आपले इतर एक्स पोस्टमध्ये ट्रोलर्ससोबत झालेल्या संभाषणांचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आणि त्यांच्या प्रोफाइलची माहिती देखील दिली. जेव्हा एका भारतीय युजरने त्याच्यावर राग वाढवण्याचा आरोप केला, तेव्हा रूटलेजने म्हटले, "मला भारत आवडत नाही आणि त्यामुळेच मला वाटले की धमकी देणारा भारतीय असू शकतो."
सोशल मीडियावर संतापाची लाट
ब्रिटिश यूट्यूबरच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावर मोठा संताप उसळला असून, रूटलेजला त्याच्या टिप्पण्यांबद्दल कडवट टीकेला सामोरे जावे लागत आहे. काहींनी त्याच्या खात्याला त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
रूटलेजने यापूर्वी असेही लिहिले होते की, "जर माझा पुनर्जन्म झाला, तर मी भारत आणि आफ्रिकेत वाढणाऱ्या लोकसंख्येचे समाधान करण्यासाठी मानवतेला योगदान देणाऱ्या व्हायरसच्या रूपात परत येईन."
या वादग्रस्त विधानांमुळे माइल्स रूटलेजला जागतिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागत आहे. भारतीयांसह अनेकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
कोण आहे यूट्यूबर माइल्स रूटलेज?
माइल्स रूटलेज ज्याला "लॉर्ड माइल्स" म्हणून ओळखले जाते, हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्याचे यूट्यूबवर 1,26,000 पेक्षा अधिक सब्सक्राइबर आहेत. रूटलेज पहिल्यांदा 2021 मध्ये चर्चेत आले होता, जेव्हा त्यांनी गूगलच्या "जगातील सर्वात धोकादायक देश" यादीतील अफगाणिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेतला. तालिबानच्या आक्रमणादरम्यान देशात असताना, ते तेथे अडकले होते. एका मुलाखतीत माइल्स याने सांगितले की, त्याला अफगाणिस्तान परत जायला आवडेल आणि तेथे आपला सांस्कृतिक अनुभव घ्यायला आवडेल. "धोकादायक पर्यटक" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माइल्स याने सांगितले की, त्यानी तालिबान आणि नाटोच्या विशेष सैनिकांशी "हसतमुख" मैत्री केली आहे.
फेब्रुवारी 2023 च्या अखेरीस रूटलेज त्याच्या तिसऱ्या अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. मात्र, त्याला तालिबानच्या गुप्तचरांनी आठ महिन्यांसाठी कारागृहात ठेवले. त्यानी सांगितले की, ही त्यांची सर्वात आनंददायक सुट्टी होती कारण त्याना तालिबान सरकारच्या शीर्ष अधिकाऱ्यांशी मैत्री करण्याची संधी मिळाली. 2024 मध्ये रूटलेज याने भारत आणि आफ्रिकेच्या विरोधात आपल्या वांशिक विचारसरणीसाठी चर्चा केली. त्यांनी अलीकडेच एका अज्ञात वापरकर्त्याशी झालेली त्यांची संभाषण शेअर केली, ज्यामध्ये त्याला शोधून काढण्याची धमकी देण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.