दुबई - जगातील सर्वांत उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणारी दुबईमधील बुर्ज खलिफा आता जगातील सर्वांत उंच दानपेटी बनली आहे. संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला असून येथेही अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रमजानच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशातील अल्प उत्पन्न गटातील १० दशलक्ष लोकांना जेवण मिळावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपक्रम नेमका काय?
बुर्ज खलिफावर दहा लाखांपेक्षाही अधिक दिवे आहेत. एखाद्या व्यक्तीने गरजूला मदत म्हणून १० दिरहम (२.७ डॉलर ) एवढी रक्कम दान केली तर त्या दानाचे एक प्रतिक म्हणून या इमारतीवरील एक एलईडी दिवा प्रज्वलित करण्यात येईल, टप्याटप्याने दान वाढत जाईल तसे अनेक दिवे प्रज्वलित करण्यात येतील.
लोकांचा प्रतिसाद
या आवाहनाला २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच लोकांनी दान करायला सुरवात केली. आतापर्यंत एक लाख ७६ हजार लोकांनी दान केल्याचे इमारतीवर प्रज्वलित झालेल्या दिव्यावरून दिसून येते. याआधी देखील ऑस्ट्रेलियामध्ये बुशफायरचा भडका उडाल्यानंतर आणि चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर बुर्ज खलिफावर अशाच पद्धतीने रोषणाई करण्यात आली होती. सध्या यूएईमध्ये ही कोरोनाने धुमाकूळ घातला असून येथे १४ हजारांपेक्षाही अधिक लोकांना बाधा झाली असून १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.