अफगाणिस्तान (Afganistan) आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी भारत आणि इराण सातत्याने (India Iran Relationship) एकत्र काम करत आहेत. दरम्यान, आता इराणमधील चाबहार (Iran Chabahar Port) बंदरातून न्हावा शेवा आणि कांडला दरम्यान थेट कंटेनर शिपिंग मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाने पहिली कंटेनर सेवा 16 फेब्रुवारीला इराणच्या शाहिद बेहेश्ती बंदरात दाखल होणार आहे. (India Found New Rout For Chabahar Port)
चाबहार बंदरातून भारताकडून पाकिस्तान बायपास
अफगाणिस्तान आणि पर्शियन आखातातील देश तसेच मध्य आशियातील देशांना माल पाठवण्यासाठी भारत या शिपिंग (Shipping Rout For Chabahar Port) मार्गांचा वापर करत आहे. दरम्यान, या सर्वामध्ये चाबहार बंदराच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला (India Bypass Pakistan For Chabahar Port) बायपास करून अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये मालाची वाहतूक करत आहे. तसेच यामुळे अफगाणिस्तानलाही एक प्रकारे समुद्रात (See Rout For Chabahar Port) प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
शिपिंग लाइन 2017 मध्ये सुरू झाली
भारताने यापूर्वी 2017 मध्ये चाबहार-मुंबई आणि मुंद्रा बंदरा दरम्यान शिपिंग लाइन सुरू केली होती. जानेवारी 2019 मध्ये, दुसरा थेट शिपिंग मार्ग सुरू करण्यात आला. जो मुंबई, मुंद्रा, कांडला, चाबहार आणि शेवटी दक्षिण इराणमधील बंदर अब्बासमधून जातो. (Chabahar Port See Rout From India)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.