लिंगासारखी दिसणारी ही वनस्पती तोडू नका, मोठं नुकसान होईल; सरकारचं आवाहन

कंबोडिया (Cambodia) सरकारने लोकांना दुर्मिळ मांसाहारी पेनिस पिचर वनस्पती (Rare Carnivorous Penis Pitcher Plant) तोडण्यास मनाई केली आहे.
Rare Carnivorous Penis Pitcher Plant in Cambodia
Rare Carnivorous Penis Pitcher Plant in CambodiaSakal
Updated on

कंबोडिया (Cambodia) सरकारने लोकांना दुर्मिळ मांसाहारी पेनिस पिचर वनस्पती (Rare Carnivorous Penis Pitcher Plant) तोडण्यास मनाई केली आहे. ही वनस्पती पुरुषाच्या लिंगासारखी ((Penis) दिसणारी वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालयाने आपल्या फेसबुक पेजवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तीन कंबोडियन महिला पेनिस वनस्पती तोडून नेताना दिसत आहेत.

खमेर टाईम्सच्या वृत्तानुसार, कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वनस्पतीला हानी न पोहोचवण्याची विनंती केली आहे. कंबोडियाच्या मंत्रालयाने आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे की, "हे लोक जे करत आहेत ते चुकीचे आहे. पर्यावरणाच्या हितासाठी भविष्यात असे करू नका. नैसर्गिक संसाधनांवर तुमचे प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद. मात्र ही वनस्पती कुठेही लावू नका, कारण आता ते कचरा झाला आहे."

Rare Carnivorous Penis Pitcher Plant in Cambodia
Taj Mahal: ताजमहाल कोणाचा? मुघलांचा की राजपुतांचा?

छायाचित्रकाराने शोधून काढली होती ही वनस्पती-

काही माध्यम संस्थांनी ही वनस्पती नेपेंथेस होल्डेनी (Nepenthes Holdenii) असल्याचे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात ही दुर्मिळ वनस्पती नेपेंथेस बोकोरेन्सिस (Nepenthes bokorensis) प्रजातीच्या जवळची वाटते. या वनस्पतीला प्रथम वन्यजीव छायाचित्रकार जेरेमी होल्डेनी आणि वनस्पति चित्रकार फ्रास्वां मे यांनी शोधले होते. दोन्ही प्रजाती दिसायला खूप सारख्या आहेत. दोन्ही डोंगराळ भागात आढळतात. त्यामुळे लोक आणखी गोंधळून जातात.

दोनपैकी एकच वनस्पती आहे दुर्मिळ-

नेपेंथेस होल्डेनी अधिक दुर्मिळ आहे. जेरेमी होल्डन म्हणतात की, ही वनस्पती दक्षिण-पश्चिम कंबोडियाच्या वेलची पर्वतावरील काही निवडक ठिकाणीच वाढते. नोम बोकोर नावाच्या भागात नेपेंथेस बोकोरेन्सिस बहुतेकदा दिसून येतो. त्या वनस्पतीचाही बराच विकास झाला आहे. पण नेपेंथेस होल्डेनी फार दुर्मिळ आहे.

Rare Carnivorous Penis Pitcher Plant in Cambodia
Tourism: फिरायला जायचंय? मग या सुंदर ठिकाणांचा विचार नक्की करा

कँडीसारखा येतो वास-

कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालयाने लोकांना असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्येही अपील करण्यात आले होते. कारण Nepenthes Holdenii ही अत्यंत दुर्मिळ वनस्पती आहे. ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लोक हे फोटोजेनिक प्लांट मुद्दाम तोडतात. त्यामुळे तिची प्रजाती धोक्यात आली आहे. ही एक अशी वनस्पती आहे, जी अत्यंत कमी पोषक मातीतही वाढते. ती कीटक खाते. या वनस्पतीतून कँडीसारखा गोड सुगंध येतो.

ही झाडे होत आहेत कमी-

पेनिस पिचर प्लांटमध्ये कीटक प्रवेश करताच, तिची पाने वरून बंद होतात. यानंतर, या वनस्पतीतून विशिष्ट प्रकारचे पाचक रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे कीटक वितळतात. या कीटकांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या पोषक तत्वांमुळे ही वनस्पती विकसित होते. कंबोडियामध्ये शेतजमिनीसाठीही मोठ्या प्रमाणात ही वनस्पती तोडली जात आहे. त्यामुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही दुर्मिळ मांसाहारी वनस्पती तोडू नका, त्यामुळे मोठे नुकसान होईल, असं आवाहन सरकारने केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.