काय सांगता! 14 कोटींना विकला गेला उंट! काय आहे कारण वाचा

जगातील सर्वात मोठा उंट मेळा सौदी अरेबियातही भरतो.
camel-sold-for-14-crores
camel-sold-for-14-croressakal
Updated on

Most Expensive Camel: इस्लामचा पवित्र महिना रमझान सुरू होणार आहे. त्याआधी सौदी अरेबियामध्ये एक उंट विकला गेला आहे. तो किती किमतीत विकला गेलाय ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा उंट जगातला सर्वात महाग उंट असल्याचे सांगितले जात आहे. या उंटासाठी 7 दशलक्ष सौदी रियाल म्हणजेच सुमारे 14 कोटी 23 लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

camel-sold-for-14-crores
१२ वर्ष तो जेवलाच नाही; चक्क खातोय दगड!

१४ कोटींमध्ये विकला गेला उंट

गल्फ न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. या उंटाच्या खरेदीसाठी सौदी अरेबियामध्ये सार्वजनिक लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पारंपारिक वेशभूषा केलेला एक माणूस मायक्रोफोनद्वारे लिलावात बोली लावत आहे. या उंटासाठी सुरूवातीला 5 दशलक्ष सौदी रियाल म्हणजेच सुमारे 10 कोटी 16 लाख रूपये ठेवण्यात आली होती. त्यांनत ती त्याची बोली 7 दशलक्ष सौदी रियालच्या बोलीवर अंतीम करण्यात आली. एवढी जास्त बोली लावून उंटाची खरेदी कोणी केली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. पण व्हिडिओमध्ये दिसते की, त्या उंटाला एका धातुच्या बाडात ठेवण्यात आले आहे. पारंपारिक कपडे घातलेले लोक लिलावात सामील झाले आहेत.

camel-sold-for-14-crores
१ एप्रिलपासून महागणार 'या' गोष्टी

ही आहे उंटाची खासियत

लिलाव झालेला हा उंट जगातील दुर्मिळ उंटांपैकी एक मानला जातो. जगात या प्रजातीचे उंट फार कमी आहेत. तो खास सौंदर्य आणि वेगळेपणासाठी जगभर प्रसिद्ध आहे.सौदी अरेबियामध्ये ईदच्या दिवशी उंटांची कुर्बानी दिली जाते. जगातील सर्वात मोठा उंट मेळा सौदी अरेबियातही भरतो. म्हणून सौदी अरेबियामध्ये एवढ्या महागड्या किमतीत या उंटाचा लिलाव झाला आहे.

camel-sold-for-14-crores
सन २०२५-२६ पर्यंत 'या' क्षेत्रात असतील १ कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.