नवी दिल्ली- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्राइल-हमास संघर्षाबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. इस्राइलने हमास नियंत्रित गाझा पट्टीत घेतलेला आक्रमक पवित्रा घातक ठरु शकतो. गाझा पट्टीत नागरिकांची जीवितहानी दूरगामी परिणाम करु शकते, असं पुतिन म्हणाले आहेत. गाझा पट्टीतील भयानक शस्त्रास्त्रांचा वापर प्रकरणाचा गुंता आणखी वाढेल आणि त्याचे परिणाम वाईट होतील, असं ते म्हणालेत.
नागरिकांचा मृत्यू कधीही स्विकार्ह होऊ शकत नाही. त्यामुळे जे रक्त सांडलं जातंय ते थांबायला हवं, असं पुतिन म्हणालेत. तसेच संघर्ष थांबावा यासाठी इतर देशांशी सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले आहेत. रशियाने आतापर्यंत संघर्षामध्ये सावध भूमिका घेतली आहे. विशेषत: अमेरिकेला युद्धासाठी जबाबदार धरलं आहे.
अनपेक्षित हल्ल्याला विरोध करण्याचा इस्राइलला पूर्ण अधिकार आहे. पण, गाझा पट्टीतील हिंचासार आता थांबवायला हवा. संघर्ष थांववून परिस्थिती पूर्वपदावर आणली जावी. या सर्व संघर्षासाठी अमेरिकेचे धोरण जबाबदार आहे. सध्या जमिनी स्तरावर शांतता आवश्यक असून मध्यस्थीसाठी रशिया इतर देशांसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचं पुतिन म्हणालेत.
रशियाच्या सावध भूमिकेवरुन ते इस्राइल आणि पॅलेस्टिन या दोघांसोबत संबंध चांगले ठेवू पाहात असल्याचं समजतंय. पण, यातील तज्ज्ञ लोकांच्या मतानुसार, रशियाचे खरा डाव वेगळाच आहे. कारण, इस्राइल- पॅलेस्टिन संघर्ष जास्त काळ टिकवून ठेवण्यात पुतिन यांनाच फायदा आहे. युक्रेनमध्ये युद्धात गुंतलेल्या रशियाला मध्य पूर्वेतील संघर्ष वेगळी संधी मिळवून देऊ शकते.
बिझनेस इनसाईडरच्या रिपोर्टनुसार, पुतिन युक्रेनमध्ये दुरगामी धोरण आखत आहेत. त्यांनी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला. पश्चिमी देश युक्रेनला करत असलेली शस्त्रास्त्रांची मदत कमी व्हावी यासाठी रशिया प्रयत्नशील आहे.आता मध्य पूर्वेत संघर्ष सुरु झाल्याने रशिला फायदा होऊ शकतो. कारण, आता पश्चिमी देशांकडून युक्रेनला होणारा शस्त्र पुरवठा मध्य पूर्वेकडे वळेल किंवा कमी होईल. तसेच पश्चिमी देशांचे लक्ष देखील युक्रेनवरुन दुसरीकडे केंद्रीत होईल.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुतिन यांना तेलाच्या किंमती वाढत्या ठेवायच्या आहेत. रशियाची आर्थिक स्थिती तेलावर अवलंबून आहे. जास्तीचा तेलाचा पैसा युक्रेनच्या युद्धात वापरला जात आहे. रशियाने सौदी अरेबियासोबत मिळून तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. आता मध्य पूर्वेतच युद्ध भडकल्याने तेलाच्या किंमती वाढणे साहजिकच आहे.
तेलाच्या किंमती वाढत गेल्या तर रशिया शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवू शकतो. तसेच आर्थिक तूट भरुन काढू शकतो. त्यामुळे संघर्षाच्या परिस्थितीचा रशियाला फायदा होणार आहे. त्यातच आता रशियाने मध्यस्थीची तयारी दाखवली असल्याने त्यांच्या हेतूवर शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, रशिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय देशांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.