Lakhbir Singh Landa : कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधात भारत आक्रमक! बब्बर खालसाचा लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित

बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या संघटनेचा नेता आणि गँगस्टर लखबीर सिंह लांडा याला भारतसरकारने दहशतवादी घोषित केलं आहे.
Lakhbir Singh Landa In Canada declared Terrorist
Lakhbir Singh Landa In Canada declared Terrorist
Updated on

Lakhbir Singh Landa In Canada declared Terrorist : बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) संघटनेचा नेता आणि गँगस्टर लखबीर सिंह लांडा याला भारतसरकारने दहशतवादी घोषित केलं आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मूळची पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील लांडा सध्या कॅनडातील अल्बर्टा येथील एडमंटन येथे राहतो आहे. तो खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होता, त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडून त्याच्याविरुद्ध तपास सुरू करण्यात आला. गृह मंत्रालयाने शुक्रवारी अधिसूचना जारी करून या निर्णयाची माहिती दिली आहे. या अधिसूचनेनुसार, लांडा हा पाकिस्तानमधून भारतात शस्त्रे आणि आयईडी उपकरणांची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार आहे. एनआयएने त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

Lakhbir Singh Landa In Canada declared Terrorist
Mangaon Accident : ताम्हिणी घाट परिसरात खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली! दोघांचा मृत्यू, 55 जण जखमी

लांडा हा 9 मे 2022 रोजी पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. याप्रकरणी पंजाब पोलिस आणि एनआयएने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तो कॅनडामध्ये लपून बसल्याने त्याला अटक करण्यात यश मिळू शकले नाहीये.

लांडा हा कॅनडातील खलिस्तान समर्थकांशी देखील संबंधीत आहे. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लांडा पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून विविध मॉड्यूल्सना इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IEDs), शस्त्रे, अत्याधुनिक शस्त्रे, स्फोटके पुरवतो.पंजाबसोबतच देशाच्या विविध भागात दहशतवादी माड्युल तयार करत आहे. यात खंडणी, खून, बॉम्बस्फोट, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यांचाही समावेश आहे. 2021 मध्ये लांडाच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. एनआयएने त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले आहे.

Lakhbir Singh Landa In Canada declared Terrorist
New Tax Slabs : नवीन कर स्लॅबमध्ये 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर; जाणून घ्या कोणते बदल होणार?

10 लाखांचं बक्षिस

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ने सप्टेंबरमध्ये कॅनडा येथील दहशतवादी लखबीर सिंग लांडा आणि पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग रिंडा यांच्यासह बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) च्या पाच दहशतवाद्यांची माहिती देणार्‍यास रोख बक्षीस जाहीर केले होते.

एजन्सीने लांडा आणि रिंडा यांची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय परमिंदर सिंग कैरा उर्फ ​​पट्टू, सतनाम सिंग उर्फ ​​सतबीर सिंग आणि यादविंदर सिंग उर्फ ​​यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हे सर्वजण लांडाचे सहकारी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()