Canada Government Declares Special Day : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडा सरकारमधील तणाव वाढल्याचं दिसत होतं. मात्र, आता ट्रुडो सरकारने अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने एक मोठा निर्णय घेतला आहे. आजचा दिवस हा एक विशेष दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय कॅनडाने घेतला आहे.
कॅनडामध्ये असणाऱ्या ओकव्हिले आणि ब्रॅम्पटन या शहरांमध्ये 22 जानेवारी हा विशेष दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हिंदू समुदायाच्या आस्थेचा मान राखत ओकव्हिलेचे मेयर रॉब बर्टन आणि ब्रॅम्प्टनचे मेयर पॅट्रिक ब्राऊन यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.
राम मंदिराचं उद्घाटन हे शांती, एकता आणि सद्भाव या मूल्यांचं प्रतिक असल्याचं या महापौरांनी म्हटलं आहे. त्यांनी या घटनेच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वावर भर दिला. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
तब्बल 500 वर्षांनी आज जगभरातील श्रीरामभक्तांचं स्वप्न साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी शुभमूहुर्तावर हा सोहळा संपन्न होईल. (Today is a historic day)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.