Hindu Temple : 'या' देशात पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतीवर लिहिलेल्या भारतविरोधी घोषणा

कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.
Swaminarayan Mandir
Swaminarayan Mandiresakal
Updated on
Summary

श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर काळ्या रंगात हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

Canada Hindu Temple Vandalised : कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका हिंदू (Hindu Temple) मंदिराची तोडफोड झाल्याची घटना समोर आलीये. ओंटारियो प्रांतातील विंडसर शहरामधील (Windsor City) हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असून द्वेषपूर्ण घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन संशयितांचा शोध सुरू आहे. श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर काळ्या रंगात हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.

विंडसर पोलिसांनी (Windsor Police) सांगितलं की, हिंदू मंदिराची तोडफोड ही द्वेषपूर्ण घटना म्हणून चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ मिळवला आहे. यामध्ये मध्यरात्री 12 नंतर दोन संशयित या परिसरात दिसले. व्हिडिओमध्ये एक संशयित इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे, तर दुसरा त्याच्या बाजूला उभा आहे.

Swaminarayan Mandir
Election Commission : 'या' समाजाविरुध्द भडकाऊ भाषण; निवडणूक आयोगाची कॅबिनेट मंत्र्यावर मोठी कारवाई
Canada Hindu Temple Vandalised
Canada Hindu Temple Vandalised

संशयितांची ओळख पटली

पोलिसांनी सांगितलं की, एका संशयितानं काळ्या रंगाचा स्वेटर, काळी पॅन्ट आणि रनिंग शूज घातले होते. तर दुसऱ्या संशयितानं काळी पॅन्ट, स्वेटर, काळे शूज आणि पांढरे मोजे घातले होते.

Swaminarayan Mandir
Karnataka Election : मुस्लिमांचं कोणतंही आरक्षण संपणार नाही; निवडणुकीपूर्वी अमित शहांचं मोठं आश्वासन

पाचव्यांदा मंदिरांना केलं लक्ष्य

कॅनडातील हिंदू मंदिरांमध्ये याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मात्र, आजतागायत तिथल्या सरकारनं कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. विंडसरमधील मंदिराची तोडफोड होण्याची ही पाचवी घटना आहे. याआधी 14 फेब्रुवारीला मिसिसॉगा येथील राम मंदिरात तोडफोड करण्यासोबतच हिंदुविरोधी आणि भारतविरोधी घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.