India Canada Dispute : ट्रूडोंच्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा; निज्जर हत्येप्रकरणी भारतीय राजदूताचा मोठा खुलासा

खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात वाद सुरू आहे.
canada india dispute ambassador on trudeau statement asks Canada to produce evidence in nijjar murder case
canada india dispute ambassador on trudeau statement asks Canada to produce evidence in nijjar murder case
Updated on

खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात वाद सुरू आहे. यादरम्यान भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येबाबत जस्टीन ट्रू़डो यांनी केलेल्या आरोपांवर पुन्हा एकदा पुरावे मागीतले आहेत.

भारतीय राजदूत संजय कुमारप यांनी द ग्लोब एंड मेल ला सांगितलेल्या माहितीनुसार निज्जर ची हत्येमध्ये भारताचा संबंध असल्याबद्दल कॅनडा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी कुठलाही ठोस पुरावा दिला नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी कॅनडाच्या पोलीसांनी भारताला कुठलाही पुरवा दाखवला नाही. तसेच त्यांनी पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केलेल्या वक्तव्यांमुळ तपासात अडथळे आल्याचे देखील म्हटले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी जून मध्ये निज्जर याच्या हत्येत भारत सराकरच्या एजंट्सचा हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर भारताने नाराजी व्यक्त केली होती. भारताने आरोप बिनबुडाचे असल्याचा सांगत फेटाळले होते.

canada india dispute ambassador on trudeau statement asks Canada to produce evidence in nijjar murder case
IND vs SA Weather : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाचे विघ्न? जाणून घ्या कसे असेल कोलकाताचे हवामान

या प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी आम्हाला कोणतीही विशिष्ट किंवा संबंधित माहिती देण्यात आलेली नाही, असे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा म्हणाले.

तपासाचा पुरावा आणि निष्कर्ष कुठे आहेत? मी एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की तपास आधीच दूषित झाला आहे. यामागे भारत किंवा भारतीय एजंट आहेत, असे सांगण्याचा सूचना उच्च पातळीवरून कोणीतरी दिल्या आहेत.

निज्जर याच्या हत्येमागे भारताचा सहभाग ठामपणे नकारत वर्मा म्हणाले की, राजनैतिकांमध्ये झालेले कोणतेही संभाषण संरक्षित आहे आणि ते न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकत नाही.

canada india dispute ambassador on trudeau statement asks Canada to produce evidence in nijjar murder case
Virat Kohli Birthday: वर्ल्डकप फिव्हर! 'बर्थडे बॉय' कोहलीला केस कापतानाही आवरला नाही PAK Vs NZ मॅच पाहाण्याचा मोह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.