ओन्टारिओ : कॅनडात झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात एक भारतीय दाम्पत्य आणि त्यांचा नातवासह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनेक वाहनांच्या जोरदार धडकेमुळं हा अपघात झाला. व्हाईटबे शहरात सोमवारी हायवे क्रमांक ४०१ वर ही दुर्घटना घडली. टोरोन्टोतील भारताच्या वाणिज्य दूतावासानं याबाबत माहिती दिली आहे. (Canada Indian couple their grandchild killed in multi vehicle accident)
दुतावासाच्या माहितीनुसार, दक्षिण भारतीय असलेले मणिवन्नन आणि त्यांची पत्नी महालक्ष्मी तसेच त्यांचा तीन महिन्यांचा नातू यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तर मृत बाळाचे आई-वडिल यातून बचावले आहेत, पण ते गंभीर जखमी आहेत. बाळाचे ३३ वर्षीय वडील आणि २७ वर्षीय आई यांच्यावर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आईवर महत्वाची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
कसा झाला अपघात?
ओन्टारिओच्या विशेष तपास पथकाच्या माहितीनुसार, पाच जणांचं भारतीय कुटुंब निस्सान सेन्ट्रा या कारमधून हायवे क्रमांक ४०१ वरुन प्रवास करत होते. त्याचवेळी एका मालवाहतूक करणाऱ्या वाहनानं त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघतात मालवाहतूक करणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या ३८ वर्षीय पुरुष प्रवाशी गंभीर जखमी झाला आहे. तसेच कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. (Latest Global Marathi News)
विशेष तपास पथक
या भीषण अपघाताचा कॅनडियन पोलिसांकडून विशेष तपास पथकाद्वारे तपास करण्यात येत आहे. या अपघाताच्या घटनेचा घटनाक्रम पुन्हा निर्माण करुन अपघात कसा झाला त्यामागे काही घातपाताचा हेतू होता का? हे तपासलं जात आहे. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, भारतीय वाणिज्य दुतावासानं या अपघाताप्रकरणी आतिव दुःख व्यक्त केलं आहे. तसेच या कुटुंबाच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्वप्रकारची मदत केली जाईल, असंही भारतीय दुतावासानं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.