Canada Khalistan Protest: कॅनडाप्रमाणे परदेशात तिरंग्याचा अपमान झाला तर किती शिक्षा?

परदेशात राष्ट्रध्वजाचा अपमान झाला तर?
Canada Khalistan Protest
Canada Khalistan Protestesakal
Updated on

Canada Khalistan Protest: कॅनडात खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा एकदा भारतीय तिरंग्याचा अपमान केला आहे. ही घटना कॅनडातील टोरंटो येथील आहे. काही खलिस्तानी समर्थकांनी भारतीय वाणिज्य दूतावासासमोर निदर्शने करत आपला राग भारतीय ध्वजावर काढला.

भारतीय समुदायाने या घटनेला प्रतिसाद दिला आणि राष्ट्रध्वज फडकावत तेथे पोहोचले. या प्रकारानंतर सोशल मीडियावर खलिस्तानी समर्थकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Indian Flag)

पण ही घटना भारतात नाही, तर कॅनडात घडली आहे. अशा स्थितीत कॅनडात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास किती शिक्षा होऊ शकते आणि याबाबत काय नियम आहेत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.(Canada Khalistan Protest : indian flag insult punishment in abroad)

Canada Khalistan Protest
Armed Forces Flag Day 2022 : लहानपणी शाळेत आपणही केलं होतं यात काँट्रिब्युट, आठवतंय?

परदेशात राष्ट्रध्वजाचा अपमान झाला तर?

परदेशात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्यास भारत सरकार प्रथम ज्या देशात ही घटना घडली आहे त्या देशाच्या राजदूताला बोलावते. मागे अशीच घटना ब्रिटन मध्ये घडली होती. माजी मुत्सद्दी जे.के. त्रिपाठी म्हणतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रोटोकॉल असतो.

ब्रिटनमध्ये तिरंग्याचा अवमान झाल्याच्या मागील घटनेवरून हे समजू शकते. समजा, भारताची चिन्हे, मालमत्ता, राष्ट्रध्वज किंवा इतर वस्तू ब्रिटनमध्ये असतील, तर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची आहे.

आपल्या राष्ट्रध्वजाचे किंवा इतर गोष्टींचे नुकसान झाल्यास त्या देशाकडून उत्तर मागितले जाते. त्या देशाच्या मुत्सद्द्याला घटनेशी संबंधित प्रश्न विचारले जातात. या संपूर्ण प्रकरणावर तुम्ही काय पावले उचलली, आरोपींवर कारवाई झाली का, अशी विचारणा केली जाते. पण तो देश आरोपींवर कारवाई करणार की नाही, यावर ते अवलंबून आहे. त्यासाठी त्या देशाला जबरदस्ती करता येणार नाही.

Canada Khalistan Protest
National Flag: ५ झेंड्यांनंतर सध्याचा तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून झाला फायनल

नेमकी कोणती कारवाई होते?

तिरंग्याच्या अवमानावर कोणत्या नियमानुसार कारवाई केली जाते, ते आधी समजून घेऊ. भारतात राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार तिरंग्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाते. अपमान करणार्‍याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

केवळ अपमानच नाही तर तिरंगा फडकावण्याचा आणि तो मागे ठेवण्याचा नियमही राष्ट्रीय ध्वज संहितेत सांगण्यात आला आहे. किंबहुना ध्वजाचा रंगही बदलता येत नाहीत.

Canada Khalistan Protest
Canada : 'तो काही अपराध नाही'; इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ काढल्या प्रकरणी कॅनेडीयन मेयरचं वक्तव्य

26 जानेवारी 2002 च्या ध्वज संहितेच्या नियम 2.2 मध्ये असे नमूद केले आहे की ध्वजाचा आदर करायचा म्हणून कोणत्याही दिवशी तिरंगा फडकवता येतो. ती कोणतीही व्यक्ती, सरकारी किंवा खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्था फडकवू शकते. ध्वज कसा असावा याबाबतही नियम आहे.

उदाहरणार्थ, त्याची लांबी-रुंदी गुणोत्तर 3:2 असावे. तो आयताकृती असावा. हाताने कातलेला खादीच कापड, पॉलिस्टर किंवा कॉटन फॅब्रिक असू शकते. त्यामुळे ध्वजाच्या बाबतीत निष्काळजीपणा किंवा त्याच्या डिझाइनमध्ये बदल केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()