India-Canada: चीनचा हस्तक्षेप लपवण्यासाठी भारतावर खोटे आरोप; कॅनडाच्याच पत्रकाराकडून ट्रूडोंची पोलखोल

China Intervene Canada:कॅनडाच्या पंतप्रधानाला निवडणुकीसाठी चीनकडून मिळतो पैसा, कॅनडाच्या पत्रकाराने केला गौप्यस्फोट
India-Canada Dispute
India-Canada DisputeEsakal
Updated on

Indo-Canada Relation:भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॅनडाने भारताच्या व्हिसावर बंदी आणल्यानंतर भारताकडूनही तसचं पाऊल उचलण्यात आलं. खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरुन सुरु झालेला हा वाद आता शीतयुद्धामध्ये रुपांतरीत झालाय. कॅनडाच्या पंतप्रधानांकडून वारंवार भारतावर टीका करण्यात येत आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा आरोप भारतावर लावला. त्यानंतर त्यांनी वारंवार भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. पण आता दोन देशांतील या आंतरराष्ट्रीय वादात तिसऱ्या देशाचा हात असल्याचा खुलासा झाला आहे. जस्टिन ट्रूडोच्या पक्षाला चीनकडून निवडणुकीसाठी फंडिंग केलं जातं, अशी माहिती त्या पत्रकाराने दिली.

डॅनियल बोर्डमन या 'नॅशनल टेलिग्राफ'या वृत्तसंस्थेच्या वरिष्ठ पत्रकाराने गौप्यस्फोट केलाय. आपल्या एका व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, "जस्टिन ट्रूडो यांच्या हालचालींना कुठून बळ मिळतय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये काहीही तथ्यपूर्ण स्पष्टीकरण सध्या नाहीये. त्यांच्या अशा परराष्ट्र धोरणामागे काय मानस आहे हेही समजत नाही. जस्टिन ट्रूडो यांनी भारतासोबत भांडण का सुरु केलं असेल याचं कारण माझ्याकडं आहे. कॅनडाच्या अंतर्गत कारभारात चीनचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आहे. जस्टिन ट्रूडोच्या पुरोगामी पक्षाला निवडणुकीच्या काळात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. "(Latest Marathi News)

https://x.com/ANI/status/1704864671965307082?s=20
India-Canada Dispute
नव्या संसदेतील 'एसी'ने खासदार हैराण! तब्येत खालावल्याने मतदानाच्या वेळी सोनिया गांधी गैरहजर

यापुढे ते म्हणाले की, "ही एक मोठी गोष्ट आहे ज्याची आम्हाला चौकशीची गरज आहे. खरी गोष्ट झाकण्यासाठी भारताच्या हस्तक्षेपाची कथा म्हणून रचली जात आहे, जो चिनी हस्तक्षेप आहे."

भारत आणि कॅनडामधील वाद सुरु झाल्यावर कॅनडाने भारताच्या राजन्यायिकाची हकालपट्टी केली होती. त्यावेळी त्यांनी त्या अधिकाऱ्याचं नाव जगजाहीर केलं. कॅनडाच्या या गोष्टीमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला. (Latest Marathi News)

India-Canada Dispute
Women's Reservation: ऐतिहासिक! महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर; आता फक्त...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.