Canada PM : G20 परिषदेमध्येही सुरू होते कॅनडाच्या पंतप्रधानांचे नखरे; नेमून दिलेल्या रुममध्ये राहण्यास दिला नकार - रिपोर्ट

कॅनडाकडून सातत्याने भारतावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
Canadian PM Justin Trudeau
Canadian PM Justin TrudeaueSakal
Updated on

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. याला कारण म्हणजे, कॅनडाकडून सातत्याने भारतावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मात्र, ट्रुडो यांचा फोलपणा वारंवार समोर येतो आहे. G20 परिषदेला भारतात आल्यानंतर देखील ट्रुडो यांनी बराच गोंधळ घातला होता.

G20 परिषदेला आलेल्या ट्रुडो यांनी त्यांना नेमून दिलेल्या सूटमध्ये राहण्यास नकार दिला होता. तसंच, दुसरा सूट मिळवण्यासाठी त्यांच्या सिक्युरिटी टीमने बराच वेळ वादही घातला होता. टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Canadian PM Justin Trudeau
Canada: पंतप्रधान ट्रुडो कॅनडाच्या संसदेत आक्रमक! खलिस्तानी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप

G20 परिषदेचं यावर्षीचं अध्यक्षपद भारताकडे होतं. या परिषदेच्या मुख्य बैठकीसाठी कित्येक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतात दाखल झाले होते. या सर्वांच्या राहण्यासाठी आणि सुरक्षेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी दिल्लीतील मोठ्या हॉटेल्सच्या स्पेशल सूटमध्ये विशेष बदल देखील करण्यात आले होते.

जस्टिन ट्रुडो यांच्यासाठी देखील दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये एक सूट बुक करण्यात आला होता. सिक्युरिटी प्रोटोकॉलप्रमाणे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, बुलेटप्रूफ काचा अशा गोष्टी बसवण्यात आल्या होत्या. मात्र, ट्रुडो यांच्या शिष्टमंडळाने या सूटऐवजी साध्या सूटमध्ये राहण्याची मागणी केली.

Canadian PM Justin Trudeau
India and Canada: कॅनडातील भारतीयांनी काय करावं? काय करु नये?; परराष्ट्र मंत्रालयाची अ‍ॅडव्हायझरी जाहीर

यामुळे भारतातील सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली. सुमारे काही तास ट्रुडो यांचं शिष्टमंडळ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतरही ट्रुडो यांचा विचार बदलला नाही. अखेर, त्यांना साध्या रुममध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली.

पैसे देण्याची ठेवली तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाने साध्या रुमसोबतच नेमून दिलेल्या प्रेसिडेन्शिअल सूटचेही पैसे देण्याची तयारी दर्शवली होती. तसंच, सूट बदलण्याला निर्णय हा ट्रुडो यांचा नसून कदाचित त्यांच्या सुरक्षा पथकाचा देखील असू शकतो; असंही सूत्रांनी म्हटलं आहे. सध्या सुरू असलेल्या भारत-कॅनडा तणावामुळे ट्रुडो यांच्या सुरक्षा पथकाने ही मागणी केलेली असू शकते, असं म्हटलं जात आहे.

Canadian PM Justin Trudeau
India-Canada Tension:भारतीय हिंदुंनो कॅनडा सोडून निघून जा; कॅनडातील SFJ च्या फुटीरतावाद्याने काढले फर्मान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com