कॅनडाची राजधानी ओटावामध्ये (Ottawa, Canada) कोविडमुळे निर्बंधांविरोधात (Protest against covid 19 protocols) तीन आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्यानंतर पोलिसांनी आता कारवाईला सुरूवात केली असून, आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे. डझनभर ट्रक आणि इतर वाहनांवर कारवाई केल्यानंतर शनिवारी आंदोलकांना मागे हटवण्यास सुरूवात झाली आहे. कोविड -19 निर्बंधांविरोधात तीन आठवड्यांपासून सुरू असलेलं आंदोलन आता संपेल अशी आशा सरकारला निर्माण झाली आहे. कॅनडाच्या इतिहासातील पोलीस कारवाईची ही सर्वात मोठी घटना असल्याचं समजतंय. या कारवाईसाठी देशभरातून पोलीस दलाला पाचारण करण्यात आलं होतं.
गेल्या महिन्याच्या अखेरीस आंदोलकांनी भरलेल्या ट्रकांनी पंतप्रधान कार्यालय आणि संसद हिलजवळ घेराव घातला होता. पोलिसांनी आता त्याठिकाणी जात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. संसदेच्या परिसरातील रस्ते आता पोलिसांनी रिकामे करण्यास सुरूवात केली आहे. देशात कोरोना काळात लागू केलेले निर्बंध मागे घेण्याची मागणी करत सुरू झालेलं हे आंदोलन फोडण्यासाठी पंतप्रधान जस्टिन ट्रूंडो यांच्या सरकारने मोठे प्रयत्न सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.