America Cancer invades : अमेरिकेच्या अण्वस्त्र तळावर कर्करोगाचा शिरकाव, २६८ जणांना लागण

घातक घटक आढळल्याने केंद्र रिक्त करण्याचा आदेश; २६८ जणांना लागण
America Cancer invades
America Cancer invadesSakal
Updated on

वॉशिंग्टन - अमेरिकेतील मोंटाना अण्वस्त्र तळावरील भूमिगत नियंत्रण केंद्रात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक (कार्सिनोजेन) आढळले आहेत. या घटकांचे प्रमाण असुरक्षित पातळीवर असून येथील अनेक पुरुष व महिलांनी त्यांना कर्करोग झाल्याची तक्रार केली आहे. यानंतर हा तळ तातडीने रिकामा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

America Cancer invades
National Flags: जगातल्या ५ देशांच्या राष्ट्रध्वजांवर आहेत हिंदू-बौद्ध धार्मिक चिन्हे; कोणते आहेत हे देश?

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीएमबी) तळावर जेथे ‘कार्सिनोजेन’ आढळले त्याचे नमुने घेण्यात आले आहेत. अशा भागात नव्याने स्वच्छता मोहीम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे ‘अल जझिरा’च्या संकेतस्थळावरील वृत्तात म्हटले आहे.

‘आयसीएमबी’समुदायाचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समावेश असलेल्या ‘टॉर्चलाइट इनिशिएटिव्ह या बिगर सरकारी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अण्वस्त्र तळावर काम करणारे २६८ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनी गेल्या काही वर्षांत कर्करोग, रक्ताशी संबंधित आजार किंवा अन्य गंभीर रोग झाल्याची माहिती दिली आहे.

America Cancer invades
Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू , 4 महिन्यात 9वी घटना

विशिष्ट कर्करोगाचे निदान झाल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर ‘आयसीएमबी’च्या तळावरून मोठ्या प्रमाणात नमुने घेण्यात आले. त्यातून ही बाब पुढे आली आहे, ‘एअर फोर्स ग्लोबल स्ट्राईक कमांड’ने सोमवारी (ता.७) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या नमुन्यांची तपासणी केली असता मोंटेना मधील माल्मस्ट्रॉम हवाई दलाच्या तळावरील दोन प्रक्षेपण केंद्रावर ‘पॉलिक्लोरोनायटेड बायफिनेल्स’(पीसीबी)चे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.

‘एन्हॉयनर्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ने (ईपीए) शिफारस केलेल्या पातळीपेक्षा नमुन्यांमधील ‘पीसीबी’ खूप जास्त होते. ‘पीसीबी’ हे तेलकट किंवा मेणासारखे पदार्थ आहेत जे ‘ईपीए’द्वारे ते कार्सिनोजेन म्हणून ओळखले जातात.

‘नॉन-हॉजकिन लिम्फोमा’ हा रक्ताचा दुर्मिळ कर्करोग यामुळे होऊ शकतो. या कर्करोगाची लागण तळावरील अनेकांना झाल्याचे निदान झाले आहे.

‘आयसीएमबी’च्या तळावरील नमुन्यांतून निदान झाल्यानंतर हवाई दलाच्या ग्लेबल स्ट्राइक कमांडचे कमांडर जनरल थॉमस बुशिरे यांनी तळ तातडीने रिकामा करण्याचा आदेश दिला आहे.

America Cancer invades
Pune Terrorist : एटीएसकडून पुण्यातील दहशतवादाचे प्रकरण ‘एनआयए’कडे वर्ग

तसेच कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक तेथून हटविण्यास सांगितले आहे. हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांना कुटुंबीयांनी संभाव्य धोकादायक स्थितीच्या संपर्कात येऊ नये, यासाठी त्यांना चांगल्या सुविधा देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

क्षेपणास्त्र तळावरील ज्या लोकांना कर्करोग झाला आहे, त्यातील अनेक जण ‘मिसाइलर’ म्हणून भूमिगत नियंत्रण केंद्रात काम करतात. क्षेपणास्त्रांचे तपासणी ते करतात. गरज पडल्यास अशा भूमिगत अण्वस्त्रांचे प्रक्षेपणही करतात.

America Cancer invades
Mumbai News: शिवरांयांचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी एकाला अटक

भूमिगत बंकरमध्ये दोन मिसायलर नियुक्त केलेले असतात. या केंद्रातील अनेक इलेक्ट्रॉनिक आणि अन्य साहित्य जुने झाले आहे. येथे काम करताना आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याच्या तक्रारी ‘मिसाइलर’नी अनेकवेळा केल्या होत्या.

तरीही हवा खेळती राहण्याच्या व्यवस्थेचा अभाव, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि विषारी घटक हाताळत २४ ते २८ तास काम करणे भाग पडते. ‘टॉर्चलाइट इनिशिएटिव्ह’नुसार १९६० मध्ये अमेरिकेचे मिनिटमॅन मोहीम सुरू झाल्यापासून मिसाइलरांची संख्या सुमारे २१ हजार झाली आहे.

America Cancer invades
Mumbai Local Train Update : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या पहिल्या फास्ट लोकलची वेळ बदलली

जानेवारीत नऊ जणांना कर्करोग

‘द असोसिएट प्रेस’ने जानेवारी महिन्यातील सैन्यदलाचे निवेदन मिळविले आहे. त्यातील माहितीनुसार माल्मस्ट्रोम येथील आजी आणि माजी अशा नऊ मिसाइलरना ‘नॉन-हॉजकिन लिम्फोमा’ हा रक्ताचा कर्करोग झाला होता.

हा रोग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता गृहीत धरून ‘द एअर फोर्स स्कूल ऑफ एरोस्पेस मेडिसिन’ने सर्व मिसाइलरचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.