बाकू (अझरबैजान) : आशिया आणि अमेरिकेतील शांघाय, टोकियो, न्यूयॉर्क अन् ह्युस्टन आदी बड्या शहरांतून हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन होत असून त्यामुळे हवामान बदलाची समस्या तीव्र होत असल्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणांतून उघड झाले आहे.