Ship Hijacked Near Somalia : सोमालियाजवळ जहाज 'MV LILA NORFOLK' हायजॅक, क्रू मेंबर्समध्ये 15 भारतीयांचा समावेश

सोमालिया जवळ एक जहाज हायजॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, या जहाजामध्ये १५ भारतीय क्रू मेंबर देखील आहेत.
Cargo Ship MV LILA NORFOLK with 15 Indians on board hijacked near Somalia  Indian Navy Monitors
Cargo Ship MV LILA NORFOLK with 15 Indians on board hijacked near Somalia Indian Navy Monitors
Updated on

सोमालिया जवळ एक जहाज हायजॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्वाची बाब म्हणजे, या जहाजामध्ये १५ भारतीय क्रू मेंबर देखील आहेत. 'एमव्ही लीला नॉरफोक' (MV LILA NORFOLK) नावाचे हे जहाज सोमालियाच्या समूद्र हद्दीपासून हायजॅक करण्यात आले आहे.

हायजॅक केल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने याची गंभीर दखल घेतली आहे. भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस चन्नई हायजॅक केलेल्या जहाजाच्या दिशेने रवाना केली आहे. तसेच नौदलाने ही स्थिती हाताळण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

Cargo Ship MV LILA NORFOLK with 15 Indians on board hijacked near Somalia  Indian Navy Monitors
हरियाणात माजी आमदाराच्या घरावर EDची छापेमारी; 5 कोटींची रोकडीसह 5 किलो सोने अन् 300 काडतुसे जप्त

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायजॅक करण्यात आलेलेय जहाज 'एमव्ही लीला नॉरफोक' याचा शोध घेण्यासाठी लक्ष ठेवले जात आहे. या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती गुरूवारी संध्याकाळी मिळाली. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झाल्यानंतर या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आाला आहे. भारतीय नौदल या जहाजाकडे लक्ष ठेवून आहे, तसेच क्रू मेंबर्ससोबत कम्युनिकेशन स्थापित करण्यात आले आहे. तसेच सर्व क्रू मेंबर जहाजामध्ये सुरक्षित आहेत असेही सांगण्यात आले आहे.

Cargo Ship MV LILA NORFOLK with 15 Indians on board hijacked near Somalia  Indian Navy Monitors
IIT Bombay Placements : IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांची चांदी! प्लेसमेंटमध्ये ८५ विद्यार्थांना मिळालं एक कोटीहून अधिकचं पॅकेज

सोमालियाच्या किनाऱ्याजवळ जहाज हायजॅक केले जाण्याची ही पहिली घटना नाही, काही दिवसांपूर्वीच सोमालिया येथील समुद्री चाच्यांनी अरबी समुद्रात माल्टा येथील जहाज एमव्ही रुएन हायजॅक केले होते. या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने लगेच तत्परता दाखवली होती. यावेळी नेव्हीने एक युद्धनौका आणि विमान पाठवले होते, त्यानंतर भारतीय नौदलाने हे जहाज रेस्क्यू केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.