Mickey Mouse : मिकी माऊस अन् मिनी माऊस ही कार्टून पात्रे 'कॉपीराईट'च्या बंधनातून मुक्त

मिकी माऊस आणि मिनी माऊस ही जवळपास शंभर वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली कार्टून पात्रे अद्यापही लोकप्रिय असून आता ही पात्रे ‘कॉपीराइट’च्या बंधनातून मुक्त झाली आहेत.
Mickey Mouse
Mickey Mouseesakal
Updated on

वॉशिंग्टन : तंत्रज्ञान आणि कला यांच्यात आमूलाग्र बदल होत आतापर्यंत शेकडो कार्टून पात्रे तयार होऊन लोकप्रियही झाली आहेत. मात्र, मिकी माऊस आणि मिनी माऊस ही जवळपास शंभर वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली कार्टून पात्रे अद्यापही लोकप्रिय असून आता ही पात्रे ‘कॉपीराइट’च्या बंधनातून मुक्त झाली आहेत. अमेरिकेतील कायद्यानुसार ‘डिस्ने’च्या या लाडक्या पात्रांवरील खासगी हक्क संपुष्टात आला असून आता त्यांचा इतरांनाही वापर करता येणार आहे.

‘डिस्ने’ने १९२८ मध्ये ‘स्टीमबोट विली’ या लघुपटाद्वारे मिकी माऊस आणि मिनी माऊस ही पात्रे सर्वप्रथम सादर केली होती. त्यानंतर हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरले. हे पात्र म्हणजे ‘डिस्ने’चा ब्रँड बनले. त्यांचे अनेक कार्यक्रम आणि कार्टूनपट हे मिकी माऊसलाच केंद्रस्थानी ठेवून आयोजित झाले होते. या दोन्ही पात्रांची ही पहिली आवृत्ती मागील महिन्यात, म्हणजे ९५ वर्षांनंतर ‘कॉपीराइट’मधून मुक्त झाली आहेत. त्यामुळे मिकी माऊसच्या या आवृत्तीचा वापर करण्यासाठी आता कोणाच्याही परवानगीची गरज नाही. या पात्राच्या नंतर सुधारित आवृत्त्याही तयार करण्यात आल्या. त्यांच्यावर मात्र अद्यापही ‘डिस्ने’चा हक्क असून त्यांचा वापर करण्यासाठी त्यांची परवानगी आवश्‍यक आहे.

Mickey Mouse
Chhagan Bhujbal : ''उरलासुरला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही'', आव्हाडांच्या विधानावर भुजबळांची खरमरीत टीका

चित्रपटांमध्ये वापर सुरू

मिकी माऊस कॉपीराइटमधून मुक्त होताच दोन भयपटांमध्ये त्याचा वापरही झाला आहे. त्यातील ‘मिकीज्‌ माऊस ट्रॅप’ या चित्रपटाचा ट्रेलरही एक तारखेला युट्यूबवर प्रसिद्ध झाला आहे. दुसऱ्या एका चित्रपटाचीही नुकतीच घोषणा झाली आहे. यामुळे मिकी माऊस या पात्रातील निरागसता मात्र जपली जाण्याची शक्यता कमी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

Mickey Mouse
"CM च्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो"; फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

इतरही काही पात्रे खुली

मिकी माऊसप्रमाणेच या वर्षी एक तारखेपासून ओरलँडो (कंपनी- व्हर्जिनिया वूल्फ), पीटर पॅन (जे. एम. बॅरी) आणि ‘विनी द पूह’ या पात्राचा मित्र ‘टिगर’ ही पात्रेदेखील ‘कॉपीराइट’मधून मुक्त झाली आहेत. विनी द पूह हे पात्र २०२२ मध्येच सार्वजनिक वापरासाठी खुले झाले आहे. याशिवाय ‘डिस्ने’चीच ‘प्लुटो’ आणि ‘डोनाल्ड डक’ ही पात्रेही लवकरच बंधमुक्त होणार आहेत. ही पात्रे आता सर्वांना हव्या त्या स्वरुपात वापरता येणार आहेत. नाईटमेअर फोर्ज’ या व्हिडिओगेम विकसित करणाऱ्या कंपनीने त्यांच्या एका गेममध्ये ‘स्टीमबोल विली’ हा मिकी माऊस खेळाडूंना मारत असल्याचे दाखविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.