डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराची भलतीच खोडी; चोरी करते...

ही मांजर परिसरात फिरते आणि घरातील वस्तू चोरते
cat
catcat
Updated on

जगात काही गोष्टी इतक्या अनोख्या असतात की त्यावर विश्वास बसत नाही. तुम्ही कधी चोर मांजर (Cat) पाहिले आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला प्रतिभावान चोर मांजरीबद्दल सांगणार आहोत. ही मांजर सर्व काही चोरत नाही, हे विशेष... या मांजरीची नजर फक्त खास गोष्टींवर असते. न्यूझीलंडमध्ये (New Zealand) राहणारी किथ नावाची मांजर सध्या चर्चेत आहे. या मांजरीला जगातील सर्वांत प्रतिभावान चोर मांजराचा टॅग मिळाला आहे. ही मांजर फक्त खास वस्तू चोरते (Steals special items).

न्यूझीलंडमधील (New Zealand) क्राइस्टचर्च (Christchurch) येथे राहणारी कैथ नावाची मांजर (Cat) तीन वर्षांपासून चोरी (thief) करत आहे. तो खास वस्तू चोरतो. यामध्ये ड्रग्जपासून ते महिलांच्या ब्रापर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. द गार्डियनच्या बातमीनुसार, ही मांजर त्याच्या परिसरात फिरते आणि घरातील वस्तू चोरते. या चोराची माहिती आता परिसराला नागरिकांना लागली आहे.

cat
तुकाराम मुंढे येणार अडचणीत; महापालिकेवर बरखास्तीची तलवार

कॅथचे मालक डेव्हिड आणि जीनी रम्बोल्ड यांनी त्यांच्या घराबाहेर बॉक्स ठेवला. यामध्ये कैथने चोरलेल्या सर्व वस्तू परत ठेवल्या आहेत. जेणेकरून लोक त्यांचे सामान घेऊन जाऊ शकतील. कैथ लोकांच्या घरातून ड्रग्ज आणि मुलींचे अंतर्वस्त्र चोरते. अंडरवेअरमध्येही ती लेसचीच अंडरवेअर चोरते. स्टफ नावाच्या वेबसाइटवर मुलाखत देताना कैथच्या मालकाने सांगितले, मांजरीने हिरे आणि दागिने चोरले असते तर बरे झाले असते. परंतु, तिला ड्रग्ज आणि अंडरवेअरवर आवडते.

या मांजरीला तीन वर्षांपूर्वी चोरी (thief) करण्याची सवय लागली. कैथ अगदी जवळच्या तलावातून मासे पकडते आणि घरात लपवतो. तिच्या मालकाने घराबाहेर दोन पेट्या ठेवल्या आहेत. या पेट्यांमध्ये कॅथने चोरलेल्या वस्तू ठेवल्या आहेत. कैथने एकदा एका व्यक्तीचे ब्रँडेड बूट चोरून आणले होते. या बुटाचे वजन कॅथच्या वजनापेक्षा जास्त होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()