CBI Action Against Agents: रशिया-युक्रेन युद्धासाठी मुंबईसह इतर शहरांतून मानवी तस्करी, CBIकडून मोठं रॅकेट उघड, 10 ठिकाणी छापेमारी

CBI Action Against Agents: गेल्या अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अनेक भारतीय अडकल्याचा दावा केला जात आहे. भारतीयांना रशियात पाठवणाऱ्या एजंटांवर सीबीआयने छापे टाकले आहेत.
CBI Action Against Agents
CBI Action Against AgentsEsakal
Updated on

रशिया-युक्रेन युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होत असल्याची बाब समोर आली आहे. सीबीआयकडून मुंबईसह दिल्ली, पंजाब, चंदीगड परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. या प्रकरणी सीबीआयकडून अनेक व्हिजा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (7 मार्च) ही माहिती दिली. एजन्सीने सात शहरांमध्ये 10 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की एजन्सीने अनेक व्हिसा सल्लागार कंपन्या आणि एजंट्सविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. झडतीदरम्यान अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून 50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

CBI Action Against Agents
Syria Terrorism: सीरियामध्ये दहशतवाद्यांचा तांडव! गावकऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार, 18 जणांचा मृत्यू

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सीबीआयने दिल्ली, तिरुअनंतपुरम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई येथे छापे टाकले आहेत. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात हैदराबाद येथील मोहम्मद अफसान या 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अफसानला मदतनीस म्हणून काम करण्यासाठी परदेशात नेण्यात आले, त्यानंतर त्याला युद्धात सामील करण्यात आले. सुमारे आठवडाभरापूर्वी गुजरातमधील सुरत येथील हमिल मांगुकिया नावाचा व्यक्तीही युद्धात मारला गेला होता.

CBI Action Against Agents
Google AI Tech : गुगलची एआय टेक्नॉलॉजी चोरून चीनला विकत होता इंजिनिअर; अमेरिकेत झाली अटक

मिळालेल्या माहितीनुसार, अफसानप्रमाणेच तेलंगणा आणि भारतातील इतर ठिकाणच्या अनेक तरुणांना रशियामध्ये मोठ्या पगारावर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन एजंटांद्वारे परदेशात पाठवले होते. एजंटने त्यांच्याकडून प्रति व्यक्ती साडेतीन लाख रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. नंतर त्याला युक्रेन युद्धात लढण्यासाठी पाठवण्यात आले.

CBI Action Against Agents
Nicky Halle : अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक, निकी हॅले यांची माघार

परराष्ट्र मंत्रालयाने यासाठी घेतला पुढाकार

युद्धात अडकलेल्या या व्यक्तींची लवकर सुटका व्हावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने रशियन अधिकाऱ्यांकडेही हे प्रकरण उचलून धरले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले होते की, सुमारे 20 भारतीय अजूनही रशियामध्ये अडकले आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.