'शार्ली हेब्दो'मधून हिंदू धर्मावर टीका

charlie hebdo
charlie hebdo
Updated on

पॅरिस- फ्रान्सचे कार्टुन मॅगझीन शार्ली हेब्दोने भारतातील कोरोना स्थितीवरुन बोचरी टीका केली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तसेच या विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. यावर मॅगझीनमध्ये म्हणण्यात आलंय की, 'भारतात 33 कोटी देवी-देवता आहेत, पण कोणीही ऑक्सिजनची कमतरता दूर करु शकला नाही.' कार्टुनमध्ये ऑक्सिजन सिलिंडरसह मोठ्या प्रमाणात लोक झोपलेले दाखवण्यात आले आहे. यात कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की, भारतात कोट्यवधी देवदेवता अजूनही कोणीही त्यांच्या मदतीला येऊ शकलेला नाही. (charlie hebdo magazine india health infrastructure 33 millions gods but oxygen not produce)

मॅगझीनमध्ये 33 कोटी देवतांऐवजी 33 मिलियन असं लिहिलंय, ज्याचा अर्थ 3.3 कोटी असा होतो. पण, स्पष्ट आहे की, हिंदू धर्मातील मान्यतेला आधार माणून भारतातील कोरोना स्थितीवर टीका करण्यात आली आहे. भारताची आरोग्य व्यवस्था कोरोना काळात उघडी पडली आहे. भारत कोरोना स्थिती हाताळण्यात अपयशी ठरला आहे. मॅगझीनने संबंधित कार्टून आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं आहे. आतापर्यंत याला हजारो लोकांनी शेअर केलं आहे. भारतातीन अनेकांनी या ट्विटवर नाराजी व्यक्त केलीये. अनेकांनी याला भारतीय आरोग्य व्यवस्थेऐवजी हिंदू धर्माची खिल्ली उडवली असल्याचं म्हटलं आहे.

असे असले तरी अनेकांनी या कार्टूनला अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी जोडलं आहे. दरम्यान, फ्रान्समधील मॅगजीन शार्ली हेब्दो वारंवार धार्मिक प्रकरणावर कार्टून करुन टीका करत असते. मॅगझीनने मोहम्मद पैंगबर यांचे कार्टून छापून आणले होते. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. याचप्रकरणी शार्ली हेब्दोचे अनेक कर्मचारी मारले गेले आहेत. मोठी हिंसा झाली. याचे पडसाद अनेक देशात पाहायला मिळाले. तरीही मॅगझीनने आपली भूमिका बदलली नाही. मॅगझीनचं म्हणणं आहे की, हे त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याचा ते वापर करत आहेत. भारतातील कोरोना स्थितीवर शार्ली हेब्दोने लक्ष वेधलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.