वॉशिंग्टन - अनेक देशांमध्ये झालेल्या सायबर हल्ल्यांमागे (Cyber Attack) चीनचाच (Chin) हात असल्याचा थेट आरोप अमेरिकेने (America) आज प्रथमच केला आहे. त्यांच्या या आरोपाला नाटो गटातील देशांनी आणि ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान या देशांनीही पाठिंबा दर्शविला आहे. (China Behind Many Cyber Attacks America Direct Accusation)
चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सायबर हल्ले घडवून आणले जात असल्याचा आरोप अमेरिकने केला आहे. या सायबर हल्ल्यांमुळे अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. ‘चीनच्या गुप्तचर सेवेच्या संपर्कात असलेले अनेक हॅकर जगभरातील अनेक देशांच्या संगणक यंत्रणांमध्ये घुसखोरी करत आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या एक्सचेंज सर्व्हरवरही हल्ला केला आहे. हा हल्ला झाल्याचे मार्चमध्ये उघड झाले आहे. असे सायबर हल्ले करून अनेक गोपनीय माहिती आणि संशोधन चोरले जात आहे. या सर्व हल्ल्यांना चीनच जबाबदार आहे. त्यांच्या या कृतीमुळे अर्थव्यवस्थांना आणि देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे,’ असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी चीनने हॅकिंगची प्रकारांना पाठबळ दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘व्हाइट हाउस’च्या माध्यम प्रतिनिधी जेन साकी यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आमच्या चीनविषयीच्या धोरणाला जगभरातून पाठबळ मिळत आहे. चीन पुरस्कृत सायबर हल्ल्यांमुळे केवळ अमेरिकेचेच नाही, तर इतर अनेक देशांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकत्र येऊन त्याचा सामना करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता केवळ चीनवर आरोप करण्यापेक्षा त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.