बीजिंग : चीनने हजारो सैन्य आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शांघायमध्ये पाठविले आहे. येथील दोन कोटी ६० लाख रहिवाशांची कोरोना चाचणी हजारो सैन्य आणि आरोग्य कर्मचारी करणार आहेत. सोमवारीही (ता.चार) कोरोना रुग्णांची संख्या वाढली. चीन (China) देशातील सर्वात मोठ्या आरोग्य संकटाला तोंड देत आहे. काही रहिवाशी पहाटेपूर्वीच उठले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वॅब घेतले. अनेकांनी सुरक्षित अंतर ठेवून कोरोना चाचणीसाठी रांगा लावल्या आहेत. दी पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) रविवारी सैन्यातील २ हजार वैद्यकीय कर्मचारी, तसेच नौदल आणि जाॅईन्ट लाॅजिटिक्स सपोर्ट बलाला शांघायला (Shanghai) पाठवल आहे. (China Corona Updates PLA Sends Military, Doctors To Shanghai For Covid-19 Test)
याबाबत सैन्य दलांचे वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे. जिंगासू, झेजिंग आणि राजधानी बीजिंग येथून १० हजारांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना शांघायला पाठवण्यात आले आहेत. चीन सर्वात मोठ्या आरोग्य संकटाशी तोंड देत आहे. कोरोनाचा (Corona) देशातील वुहान प्रांतात पहिल्यांदा २०१९ च्या शेवटी उद्रेक झाला होता. राज्य परिषदेने सांगितले, की पीएलएने ४ हजारांपेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हुबुईत पाठवले होते. जेथे वुहान आहे. शांघायमध्ये दोन टप्प्यात लाॅकडाऊन सुरु झाला.
२८ मार्च रोजी तो वाढवण्यात आला. ८ हजार ५८१ बिगर लक्षणे असलेले कोरोना केसेस आणि ४२५ लक्षणे असलेले कोविड केसेस तीन एप्रिलला आढळले आहेत. शांघाय हे कोरोनाचे केंद्र असून येथे मोठ्या प्रमाणावर चाचणी, रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा आणि कोरोनाबाधितांना क्वांरटाईन करणे यावर भर दिला जात आहे. देशात १२ हजार ४०० संस्थांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा असून येथे ९० लाख लोकांचा प्रत्येक दिवशी चाचणी केले जाऊ शकते, असे चिनी आरोग्य अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.