जग आता कोरोनाच्या कहरातून बाहेर पडलं आहे. न्यू नॉर्मलसुद्धा आता जुनं झालं. पण चीन मात्र अजूनही कोरोनाच्याच कचाट्यात अडकलं आहे. तिथला कोरोना प्रसार काही कमी होतच नाही. दररोज चीनमधल्या संसर्गाचे तेथील शून्य टाळेबंदीच्या त्रासाचे नवनवे किस्से समोर येत आहेत. यादरम्यान भारताला किती धोका आहे?
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) चे प्रमुख डॉ एन के अरोरा यांनी मंगळवारी सांगितले की, चीनच्या कोविड परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, परंतु भारतात घाबरण्याची गरज नाही.
"चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग होतो आहे. मात्र भारतामध्ये प्रभावी लसीकरण मोठ्या प्रमाणावर केलेले आहे अजूनही सुरू आहे.
विशेषत: प्रौढ लोकसंख्येचे मोठे लसीकरण केले जाते. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.
चीनच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्वाचे आहे, परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याने घाबरण्याची गरज नाही," अरोरा यांनी एएनआयला सांगितले.
चीनच्या शून्य-कोविड धोरणाचा अचानक अंत झाल्यामुळे त्यांच्या असुरक्षित, कमी नैसर्गिक प्रतिकारशक्ती असलेल्या लोकसंख्येत व्यापक संक्रमणाची चिंता वाढली आहे.
यामुळे आरोग्य यंत्रणेवर अती ताण येईल. परिणामी 2 दशलक्ष किंवा त्याहून अधिक मृत्यू होतील, असा अहवाल विविध संशोधन गट देत आहे.
रॉयटर्सने याबद्दलची बातमी दिली होती.
विविध गटांनी केलेल्या विश्लेषणानुसार चीनमध्ये तब्बल 2.1 दशलक्ष मृत्यू होण्याची शक्यता आहे.
सोमवारपर्यंत, चीनने अधिकृतपणे या महामारीदरम्यान 5,242 कोविड-संबंधित मृत्यूची नोंद केली आहे. मात्र ही संख्या अगदीच कमी आहे. चीनच्या लोकसंख्येचा (1.4 अब्ज) हा अगदी छोटासा भाग आहे.
दक्षिण-पश्चिम गुआंग्शी प्रदेशातील रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख झोउ जियाटोंग यांनी गेल्या महिन्यात शांघाय जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनने प्रकाशित केलेल्या एका पेपरमध्ये म्हटले होते की, मेनलँड चीनने हाँगकाँगप्रमाणेच कोविड प्रतिबंध कमी केले तर त्यांना 2 दशलक्षाहून अधिक मृत्यूंना सामोरे जावे लागेल. या वर्षी संक्रमण 233 दशलक्षांपेक्षा जास्त वाढू शकते, असा अंदाज त्यांनी बांधला होता.
मे मध्ये, चीन आणि युनायटेड स्टेट्समधील शास्त्रज्ञांनी अभ्यासातून एक निष्कर्ष काढला की, लसीकरण न वाढवता आणि कोणतीही उपचारप्रणाली न आखता चीनने अचानक आपले अत्यंत कठोर असे शून्य कोविड धोरण सोडले तर त्यांना 1.5 दशलक्ष कोविड मृत्यूचा धोका आहे. नेचर मेडिसिनमध्ये याप्रकारचे संशोधन प्रकाशित झाले होते.
ब्रिटीश वैज्ञानिक माहिती आणि विश्लेषण कंपनी एअरफिनिटीने नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सांगितले होते की, कमी लसीकरण आणि बूस्टर दर तसेच संकरित प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे चीनने शून्य-कोविड धोरण मागे घेतल्यास 1.3 दशलक्ष ते 2.1 दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.