China Defense Minister : चीनचे संरक्षण मंत्री तीन आठवड्यांपासून बेपत्ता? अमेरिकेने केले गंभीर आरोप

China News : अमेरिकेचे जपानमधील राजदूत राहम इमॅन्युएल यांनी याबाबत माहिती दिली.
China Defense Minister
China Defense MinistereSakal
Updated on

चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू हे गेल्या तीन आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांना पदावरुन कमी करण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे जपानमधील राजदूत राहम इमॅन्युएल यांनी याबाबत माहिती दिली.

65 वर्षांचे ली हे गेल्या कित्येक महत्त्वांच्या बैठकांना गैरहजर राहिले आहेत. व्हिएतनाम आणि सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांसोबत महत्त्वाच्या बैठकांना त्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र, त्यांनी या बैठका चुकवल्या. यापूर्वा त्यांना लोकांसमोर 29 ऑगस्ट रोजी शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यानंतर ते माध्यमांसमोरही दिसले नाहीत.

China Defense Minister
China Under Xi Jinping : दाढी वाढवल्याबद्दल मुस्लिमांना तुरुंगात टाकणारा कायदा.. जिनपिंग यांच्या चीन मध्ये हुकूमशाही सुरू आहे का?

इमॅन्युएल यांनी आपल्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. "अध्यक्ष शी यांचं मंत्रिमंडळ आता अगाथा ख्रिस्ती यांच्या 'अँड देन देअर वेअर नन' या कादंबरीप्रमाणे दिसू लागलं आहे. आधी परराष्ट्र मंत्री क्विन गांग हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर रॉकेट फोर्स कमांडर्स बेपत्ता झाले. आता संरक्षण मंत्री ली शांगफू हेदेखील गेल्या दोन आठवड्यांपासून गायब आहेत" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

"बेरोजगारीच्या या शर्यतीत चीनमधील तरुण जिंकतील की शी यांचं मंत्रिमंडळ?" असा खोचक प्रश्नही इमॅन्युएल यांनी आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे.

China Defense Minister
Global Leader : G20 परिषदेमुळे मोदींच्या लोकप्रियतेत वाढ; 'ग्लोबल लीडर्स' यादीत पुन्हा पटकावलं पहिलं स्थान

चीनचे परराष्ट्र मंत्री हे जुलै महिन्यापासून बेपत्ता आहेत. तर, दोन महिन्यांपूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याच्या रॉकेट फोर्समधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे चीनमध्ये सध्या काय सुरू आहे याबाबत अनेक प्रकारचे तर्क-वितर्क केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.