Nuclear Weapon : अण्वस्त्रधारी देशांमध्ये चीनचा दबदबा, तर स्पर्धेत पाक भारताच्या पुढे

रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम सर्व जगावर पडले आहे. या दोन देशांसह जगभरात भू-राजनैतिक तणाव वाढला आहे.
Nuclear Weapon
Nuclear Weaponsakal
Updated on

स्टॉकहोम (स्वीडन) - रशिया- युक्रेन युद्धाचे परिणाम सर्व जगावर पडले आहे. या दोन देशांसह जगभरात भू-राजनैतिक तणाव वाढला आहे. गेल्या वर्षी अनेक देशांच्या विशेष करून चीनच्या अण्वस्त्रांमध्ये वाढ झाली आहे. तसेच इतर अण्वस्त्रधारी देश त्यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरण तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. ही माहिती ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (सिपरी) सोमवारी दिली.

विविध देशांत वापरण्यासाठी उपलब्ध शस्त्रास्त्रे आणि त्यांचा एकूण साठा यांचा आढावा ‘सिपरी’कडून घेतला जातो. एकूण शस्त्रसाठ्यात जुन्या शस्त्रांचीही मोजणी केली जाते, जी नष्ट करण्यात येणार आहेत किंवा केली जाणार आहेत.जगातील नऊ अण्वस्त्रधारी देशांमधील अण्वस्त्रांची संख्या गेल्या वर्षापेक्षा यंदा कमी झाली असल्याचे ‘सिपरी’ने म्हटले आहे.

या संस्थेचे संचालक डॅन स्मिथ यांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, की जगभरातील अण्वस्त्रांची संख्या कमी होण्याच्या टप्पापर्यंत आपण पोहोचलो आहोत किंवा तो आपण आधीच गाठला आहे. अधिक विस्ताराने पाहिल्यास ३० पेक्षा जास्त वर्षांपासून अण्वस्त्रांमध्ये घट होत असल्याचे दिसत होते. पण आता ही प्रक्रिया थांबल्याचे चित्र आहे.

अमेरिका व रशियाची स्थिती

  • जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी अमेरिका व रशियाकडे ९० टक्के शस्त्र आहेत

  • रशियाकडे चार हजार ४८९ अण्वस्त्रसाठा. आधी ही संख्या चार हजार ४७७ होती

  • या यादीत अमेरिका दुसऱ्या स्थानी

  • अमेरिकेकडे तीन हजार ७०८ आण्विक शस्त्रे

  • या दोन्ही देशांनी सुमारे दोन हजार अण्वस्त्रे ‘हाय अलर्ट’वर म्हणजे तातडीने वापर करण्यासाठी ठेवली आहेत

  • अशी हत्यारे क्षेपणास्त्रांमध्ये किंवा तळावर तैनात आहेत

Nuclear Weapon
Cyclone Biporjoy : ...म्हणून तयार होते चक्रीवादळ?

चीनकडे सर्वाधिक अण्वस्त्रे

  • चीनकडील अण्वस्त्रांचा साठा वेगाने वाढ

  • गेल्या एक वर्षात अण्वस्त्रांमध्ये वाढ करण्यात चीनचे नाव जगात पहिल्या स्थानी

  • चीनचा अण्वस्त्र साठा ३५० वरून ४१० वर गेला आहे

  • यावर्षी ६० शस्त्रांची भर घातली

  • रशिया, भारत, पाकिस्तान, उ. कोरियानेही त्यांच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात भर टाकली

  • चीनने सैन्यदलातील सर्व विभागांवर मोठी आर्थिक तरतूद केली आहे

  • चीनची वैश्‍विक ताकद वाढत आहे आणि हे आपल्या काळातील वास्तव आहे, असे स्मिथ यांचे प्रतिपादन

अण्वस्त्रधारी भारत व पाकिस्तान

  • ‘सिपरी’च्या अहवालानुसार आण्विक शस्त्रास्त्रांमध्ये पाकिस्तान भारताच्या पुढे आहेत

  • पाकिस्तानकडे १७० तर भारताकडे १६४ अण्वस्त्रे आहेत

जगातील अण्वस्त्रांची संख्या वाढत असली तरी त्याचा संबंध युक्रेन युद्धाशी जोडला जाऊ शकत नाही. कारण नवी शस्त्रे विकसित करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. महत्त्वाचे म्हणजे जे देश शस्त्रास्त्र साठ्यात वाढ करीत आहेत, त्यांचा युद्धाशी थेट संबंध नाही.

- डॅन स्मिथ, संचालक, ‘सिपरी’

Nuclear Weapon
USA Mass Shooting : अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार, तीन जणांचा मृत्यू; सात जखमी

‘सिपरी’च्या अभ्यासातील नोंदी

  • ब्रिटन, चीन, फ्रान्स, भारत, इस्राईल, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया आणि अमेरिकेतील अण्वस्त्रांच्या संख्येत यंदा घट

  • नऊ देशांकडे २०२२ च्या सुरुवातीला १५ हजार ७१० अण्वस्त्रे होती. २०२३ च्या प्रारंभी हा आकडा १२ हजार ५१२वर आला आहे

  • या अण्वस्त्रांमधील नऊ हजार ५७६ ‘शस्त्रे संभाव्य वापरासाठी लष्करी साठ्यात’ ठेवली होती

  • या साठ्यातील शस्त्रांची संख्या गेल्या वर्षापेक्षा यंदा ८६ ने वाढली

  • रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आण्विक शस्त्रांचे नियंत्रण आणि निशस्त्रीकरण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली

  • हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियाबरोबर त्यांच्या द्विपक्षीय धोरणात्मक स्थैर्यता चर्चा’ थांबविला, हे त्याचे एक उदाहरण आहे

  • हा चर्चा म्हणजे अण्वस्त्र नियंत्रणाच्या माध्यमातून रशिया आणि अमेरिकेच्या सामरिक अण्वस्त्र शक्तीवर निर्बंध घालण्याची ती शेवटची संधी होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()