China Minister Wang Yi Meet AJit Doval : नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (China Foreign Minister Wang Yi) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी लडाखमधील वाद आणि युक्रेन युद्धाच्या परिणामांवर चर्चा केली. चीन आणि भारतातील सीमावादावर देखील चर्चा करण्यात आली असून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.
सध्याची परिस्थिती परस्पर हिताची नाही हे दोन्ही देशांनी मान्य केले. तसेच सीमावाद संपवून दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यावर जोर दिला. दोन्ही देशांनी पारदर्शकता ठेवली तर एकमेकांवरील विश्वास वाढेल आणि संबंध सुधारतील, यावर डोवाल आणि चीनच्या मंत्र्यांचे एकमत झाले. त्यानंतर चीनने अजित डोवाल यांना चीन दौऱ्याचे निमंत्रणही दिले. यावर अजित डोवाल यांनी सकारात्मक उत्तर दिले. पण, चीन आणि भारतातील सीमावादाचा मुद्दा सोडवल्यानंतरच चीनमध्ये येऊ, अशी अट डोवाल यांनी घातली. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. त्यानंतर चीनच्या मंत्र्यांची ही पहिली भारत भेट आहे. ते भारत भेटीवर येण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी पाकिस्तानमध्ये काश्मीरबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भारताकडून चीनला सुनावण्यात आले. त्यानंतर चीनचे मंत्री भारत दौऱ्यावर येणार की नाही? अशी चर्चा रंगली होती. पाकिस्तानला भेट दिल्यानंतर ते अफगाणिस्तानात गेले होते. त्यामुळे त्यांच्या भारत भेटीच्या शक्यता मावळल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांनी भारताला भेट दिली. आज सकाळी वांग यी आणि एस. जयशंकर यांची ११ वाजता दिल्लीत भेट झाली. अजित डोवाल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे परत एकदा भेट घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.