China Made flying saucer: चीनने बनवली जगातील पहिली उडती तबकडी

शेन्झेन शहराच्या UFO पॉवर तंत्रज्ञानाने विकसित केली आहे. यात 12 प्रोपेलर आहेत, पायलटची सीट त्यांच्या मध्यभागी डिझाइन केलेली आहे.
China Made flying saucer
China Made flying saucersakal
Updated on

आकाशातील उडत्या तबकडीबद्दल तुम्ही ऐकले असेलच, अनेकवेळा हे एक अंतराळ जहाज असल्याचे सांगितले जाते ज्यात एलियन्स असतात. पण हे नेमकं खरं का खोटं? माहिती नाही. पण आगामी काळात हे खरं होण्याची शक्यता आहे.

चीनने जगातील पहिली उडणारी तबकडी बनवली असण्याची शक्यता आहे, या मानवनिर्मित उडत्या तबकडीची नुकतीच चीनच्या दक्षिणेकडील शहर शेनझेनमध्ये चाचणी घेण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रॉनिक फ्लाइंग सॉसर हवा आणि जमिनीवरून टेक ऑफ आणि लँडिंग करण्यास सक्षम आहे.

China Made flying saucer
India-China Relations : आता शत्रुत्व वर्तमानपत्रापर्यंत ! वाजपेयींच्या काळातले भारत – चीनचे वृत्तपत्रीय संबंध रसातळाला

चीनमध्ये बनवलेली ही फ्लाइंग सॉसर EVTOL म्हणजेच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंगच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. म्हणजेच अवघ्या 15 मिनिटांच्या उड्डाणात ती 656 फूट उंचीवर पोहोचू शकते. हे शेन्झेन शहराच्या UFO पॉवर तंत्रज्ञानाने विकसित केली आहे. यात 12 प्रोपेलर आहेत, पायलटची सीट त्यांच्या मध्यभागी डिझाइन केलेली आहे.

China Made flying saucer
China Export : चीनच्या निर्यातीत साडेसात टक्क्यांनी घट; अहवालातून स्पष्ट

चीनमध्ये ही उडणारी तबकडी विकसित करण्यासाठी तीन वर्षे लागली. चिनी मीडियानुसार, ही फ्लाइंग सॉसर अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की ती पाण्यात किंवा जमिनीवरून कुठूनही उडू शकते. कंपनीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ते शेन्झेल तलावावर उडताना दिसत आहे. सामान्य लोकांसाठी ती कधीही लॉन्च केली जाईल हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेल नाही.

China Made flying saucer
China : चीन खोदणार दहा हजार मीटर खोल छिद्र

फ्लाइंग सॉसरच्या यशस्वी चाचणीनंतर आता चीन फ्लाइंग कार बनवणार आहे, असा दावा एका एरोस्पेस कंपनीने केला आहे. येत्या दोन वर्षात ही फ्लाइंग कार बाजारात आणली जाईल, असा दावा कंपनीने केला आहे. त्याची किंमत सुमारे 3 लाख 50 हजार डॉलर्स असण्याची शक्यता आहे.

यापूर्वी इस्रायलने फ्लाइंग टॅक्सीची चाचणी घेतली होती. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली, दोन जणांनी उडत्या टॅक्सीमध्ये बसून 30 किलोमीटरचा प्रवासही पूर्ण केला होता. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी ते लवकरच सुरू करण्यात येईल, असा दावा इस्रायलच्या पर्यटनमंत्र्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.