China Pakistan Naval Exercise : चीन आणि पाकिस्तान मिळून आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा सागरी युद्ध सराव करणार आहेत. यासाठी पाकिस्तानमधील कराची बंदरामध्ये चीनच्या युद्धनौका, जहाजे आणि पाणबुड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हिंदी महासागरात आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न चीन पहिल्यापासून करत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा सराव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कराची बंदरात चीनच्या युद्धनौका दाखल झाल्याचं छायाचित्र देखील समोर आलं आहे. 'सी गार्डियान 3' नावाचा हा पाच दिवसांचा संयुक्त नौदल सराव आजपासून सुरू होणार आहे.
यावेळी पहिल्यांदाच अरबी समुद्रात संयुक्तपणे गस्त घालण्याचा सराव देखील करण्यात येणार आहे. यासोबतच हेलिकॉप्टरचा वापर आणि पाणबुडीविरोधी कारवाईचा देखील सराव करण्यात येणार आहे. या सरावामध्ये चीनची टाईप-039 ही पाणबुडी असणार आहे.
सोबतच, टाईप-926, टाईप-54 या प्रकारची जहाजे यामध्ये सहभागी होतील. चीनच्या टाईप-52 डी डिस्ट्रॉयर आणि टाईप-903 या युद्धनौकादेखील याठिकाणी आल्या आहेत.
हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चीन गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे. यासाठी चीनला पाकिस्तानच्या मैत्रीचा फायदा होतोच आहे. सोबतच चीनने श्रीलंकेला देखील आपल्या कर्जाच्या ओझ्याखाली दाबून नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आफ्रिका खंडातही चीनकडून मोठा लष्करी तळ उभारला जातो आहे. (Global News)
चीनच्या हालचालींवर आपलं लक्ष असल्याचं भारताचे नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. चीनच्या युद्धनौका, पाणबुड्या यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका संयुक्तपणे काम करत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.