Coronavirus : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी, देशव्यापी आंदोलनाला सुरुवात!

चीनमध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 ची सर्वात मोठी लाट आली आहे.
Xi Jinping
Xi Jinpingesakal
Updated on
Summary

चीनमध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 ची सर्वात मोठी लाट आली आहे.

बीजिंग : चीनमध्ये आतापर्यंत कोव्हिड-19 ची (China Coronavirus) सर्वात मोठी लाट आलीये. तिथं कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. चीनच्या अधिकाऱ्यांच्या मते, येत्या काही महिन्यात देशामध्ये 19 ते 80 कोटी लोकांना कोव्हिडचा संसर्ग होऊ शकतो.

चीनमध्ये कोरोनामुळं मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 लाख असू शकते, असं एनपीआरचा अहवाल सांगतो. मात्र, चीननं प्रसिद्ध केलेला अधिकृत आकडा यापेक्षा खूप कमी आहे. परंतु, चीनमध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना प्रकरणांमुळं लोकांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतींविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केलीये.

Xi Jinping
Medicine Price : कॅन्सरसह 'या' आजारांवरची औषधं 40 टक्क्यांनी स्वस्त; जाणून घ्या नव्या किमती

लोक राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. शी जिनपिंग (Xi Jinping) हे चीनचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र, त्यांना जनतेनं पायउतार होण्यास सांगितलंय. इनसाइड ओव्हरच्या रिपोर्टनुसार, कोरोनाविरोधी उपायांमुळं संतप्त झालेले चीनचे लोक शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभर निदर्शनं करत आहेत. एवढंच नाही तर एका पक्षाच्या राजवटीच्या विरोधातही लोक आवाज उठवू लागले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटी विरोधात लोक बोलू लागले आहेत. शी जिनपिंग यांनी सिंहासन सोडावं आणि कम्युनिस्ट पक्षानं सत्ता सोडावी, अशा घोषणा लोक देत आहेत.

Xi Jinping
Coronavirus : शत्रू वेळोवेळी बदलत आहे, त्याच्याविरुद्ध सातत्यानं लढा देण्याची गरज; आरोग्य मंत्र्यांचं मोठं विधान

राष्ट्राध्यक्षांविरोधात घोषणाबाजी

आम्हाला आजीवन शासक नको, अशा घोषणा आंदोलनांमध्ये दिल्या जात आहेत. जिनपिंग यांच्या विरोधात लोकांच्या नाराजीचं सर्वात मोठं कारण म्हणजे, त्यांचा कोरोना महामारीला सामोरे जाण्याचा चुकीचा मार्ग आहे. चीननं कोरोनाबाबत देशभरात झिरो कोविड पॉलिसी लागू केली होती, त्यामुळं लोकांच्या जनजीवनावर थेट परिणाम होऊ लागला आणि लोक रस्त्यावर आले. यानंतर चीन सरकारनं अनेक ठिकाणी सूट दिली, त्यानंतर अचानक चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडं लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()