Xi Jinping : चीनला पोखरतोय भ्रष्टाचार! १००,००० हून अधिक पार्टी कॅडर्सना केली शिक्षा

China punishes over 100000 officials in Xi Jinping anti-corruption drive Report
China punishes over 100000 officials in Xi Jinping anti-corruption drive Report esakal
Updated on

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशभरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने एक लाखाहून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. इंडो-पॅसिफिक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स (IPCSC) च्या अहवालात याबद्दल माहिती देण्यात आली आगे

या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत आतापर्यंत 110,000 हून अधिक कॅडर्सना शिक्षा केली आहे.

तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांमध्ये राज्य स्तरावरील अधिकारी, उपराज्यस्तरीय अधिकारी, लष्करी आयोगाचे सदस्य, डझनभर मंत्री स्तरावरील अधिकारी आणि शेकडो उपमंत्री स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 111,000 लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. ज्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना च्या प्रांतीय आणि प्रांत-स्तरीय कॅडर, 633 विभाग-स्तरीय केडर, 669 जिल्हा-स्तरीय केडर आणि 1,000 टाउनशिप कॅडरचा समावेश आहे.

China punishes over 100000 officials in Xi Jinping anti-corruption drive Report
Shiv Sena Case : तो विषय वेळीच संपला असता तर ही वेळ आली नसती; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवारांची खंत

तसेच शिक्षा झालेल्यांमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे 15,000 सामान्य कॅडर आणि 76,000 ग्रामीण भागातील अधिकारी आणि व्यावसायिक कॅडर इत्यांदींसह 76,000 आधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे आकडे पक्षाच्या शिस्त तपासणीसाठीच्या केंद्रीय आयोगाच्या अधिकृत वीचॅट हँडलवर आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या राज्य पर्यवेक्षी आयोगाने जारी केलेल्या मासिक भ्रष्टाचारविरोधी अहवालातून घेण्यात आले आहेत.

China punishes over 100000 officials in Xi Jinping anti-corruption drive Report
Delhi Govt vs LG : दिल्लीवर राज्य केजरीवालांचंच! केंद्र सरकारला दणका; नायब राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल

अहवालात असे म्हटले आहे की, शिस्तपालन तपासणी आणि पर्यवेक्षण संस्थांना पहिल्या तिमाहीत 776,000 याचिका आणि रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 231,000 तक्रारी आणि आरोप होते. डू झाओकाई आणि ली झियाओपेंग हे तपासात नाव पुढे आलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी आहेत. तसेच मार्चच्या भ्रष्टाचारविरोधी अहवालातील आकडेवारीनुसार 7,021 अनियमितता तपासण्यात आल्या आणि त्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 10,285 अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.