बीजिंग : श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी मदत करण्यासाठी चीनने भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. भारत सरकारने श्रीलंकेसाठी खूप काही केले आहे, हे आम्ही लक्षात घेतले असून, या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो, असे विधान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी केले आहे. श्रीलंका आणि इतर विकसनशील देशांना शक्य तितक्या लवकर अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी चीन भारत आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास तयार असल्याचे लिजियान यांनी म्हटले आहे.
चीनने श्रीलंकेला दिलेली औषधं, तांदूळ आणि इतर वस्तूंची अलीकडेच पाठवण्यात आली असून, श्रीलंकन नागरिकांना मदत करण्यासाठी उपलब्ध माध्यमांचा पुरेपूर वापर करण्याचा चीन सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असे लिजियाना यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी चीनकडून श्रीलंकेला नुकत्याच करण्यात आलेल्या 73 दशलक्ष डॉलरच्या मदतीचीदेखील आठवण करून दिली.
झाओ लिजियान पुढे म्हणाले की, पारंपारिक मैत्रीपूर्ण शेजारी म्हणून श्रीलंकेसमोरील अडचणी आणि आव्हानांकडे आम्ही बारकाईने लक्ष देत असून, श्रीलंकेच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी चीनने नेहमी त्याच्या क्षमतेनुसार मदत केली आहे. श्रीलंकेतील सध्याच्या अडचणी आणि कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी चीन सकारात्मक भूमिका बजावण्यासाठी संबंधित देश आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांसोबत काम करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.