चीनचा हेका कायम; WHO च्या टीमला सुरवातीच्या रुग्णांची माहिती देण्यास दिला नकार

china
china
Updated on

नवी दिल्ली : संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं महासंकट पसरवणाऱ्या चीनने आपला हेका कायम ठेवला आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम चीनला गेली असून कोरोना व्हायरसच्या उगमाबाबतचा अभ्यास या टीमकडून करण्यात येत आहे. या टीमला कोरोना संक्रमणाशी निगडीत सुरवातीचे आकडे देण्यास चीनने साफ नकार दिला आहे. अमेरिकेतील मीडियाने कोरोना प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चीनला गेलेल्या WHO च्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार, WHO ची टीम आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये या डेटावरुन वाद झाला. चीनचे अधिकारी कोरोना संक्रमणाच्या सुरवातीच्या 174 रुग्णांबाबत सविस्तर माहिती देत नव्हते. WHO च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जर सुरवातीचा आणि व्यक्तीगत डेटा मिळू शखला तर चीनमध्ये कधी आणि कशाप्रकारे कोरोना व्हायरस पसरला याबाबतची निश्चिती करणे सोपे जाऊ शकते. 

व्हायरसचा स्त्रोत शोधणं झालंय कठीण
टीममध्ये असलेले ऑस्ट्रेलियाचे डॉ. डॉमिनिक डॉयर यांनी सांगितलं की, चीनच्या अशा हेकेखोर वागण्यामुळे व्हायरसच्या स्त्रोताची माहिती मिळवणे कठीण जातंय. टीमने प्रकरणाशी निगडीत माहिती मागितली होती. जर हा डेटा मिळाला असता तर रुग्णांच्या केस हिस्ट्रीमधून त्याला हा संक्रमण कसे आणि कूठून झाले, याची माहिती मिळवता आली असती. याआधी चीनमधून कोरोना महासंकट पसरण्याला कारणीभूत घटकांची तपासणी करण्यासाठी पोहोचलेल्या WHOच्या टीमने म्हटलं होतं की, वुहानमध्ये अथवा कुठेही डिसेंबर 2019 च्या आधी हे संक्रमण मोठ्या प्रमाणावर पसरण्याचे कसलेही पुरावे सापडले नाहीयेत. त्यानंतरच हा रोग दुसऱ्या भागात पसरला आहे. WHO च्या टीमने म्हटलंय की वुहानच्या लॅबमधूनच कोरोना पसरला आहे, याचा कसलाही पुरावा नाहीये. 

WHO चे विशेषज्ज्ञ पीटर बेन एम्बपेक यांनी म्हटलं की चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यताच नाहीये. हे संक्रमण प्राण्यांकडून माणसाच्या शरीरात आला, याची शक्यता जास्त आहे. कोरोनाबाबत अनेक प्रकारचे दावे केले गेले आहेत. असं देखील म्हटलं गेलं होतं की, वुहानच्या लॅबमधून एका प्रयोगमुळे हा विषाणू पसरला. वटवाघळामधून हा विषाणू माणसामध्ये आल्याचाही दावा केला गेला. मात्र, अद्याप हा दावा खरा ठरेल, असा कोणताही पुरावा सापडला नाहीये. सर्वात जास्त भीती वाटणारा वाहक प्रजातींकडून हा जंतू मानवी शरीरावर पोहोचला. मी तुम्हाला सांगतो, कोरोनाबद्दल बरेच दावे झाले आहेत. वुहानच्या प्रयोगशाळेत चीनने केलेल्या प्रयोगातून त्याचा प्रसार झाल्याचेही सांगण्यात आले. हा विषाणू बॅट्सपासून मानवांमध्ये पसरल्याचा दावा देखील करण्यात आला आहे, परंतु अद्यापपर्यंत या दाव्यांची पुष्टी झालेली नाही.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.