China-Russia Relations : ‘चीन-रशिया मैत्री जागतिक स्थैर्यासाठी’

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे चीन दौऱ्यावर आले असून त्यांनी आज या देशाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ‘चीन व रशियातील मैत्री हा जगात स्थैर्य निर्माण करणारा घटक असून ही मैत्री इतर देशांसाठी आदर्श आहे,
China-Russia Relations
China-Russia Relations sakal
Updated on

बीजिंग : रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे चीन दौऱ्यावर आले असून त्यांनी आज या देशाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ‘चीन व रशियातील मैत्री हा जगात स्थैर्य निर्माण करणारा घटक असून ही मैत्री इतर देशांसाठी आदर्श आहे,’ असे मत पुतीन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

रशियाने युक्रेनवर युद्धानंतर अमेरिकेसह युरोपीय देशांनी या देशावर निर्बंध जारी केले. चीनने मात्र रशियाला पूरक भूमिका घेतली. चीनने रशियाला असलेले समर्थन कमी करावे, असा दबाव असतानाही जिनपिंग यांनी पुतीन यांना भेटीचे निमंत्रण दिले. आज या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.