नवी दिल्ली : चीन आपल्या कुरापत्या सोडायला तयार नाही. तैवानच्या हवाई क्षेत्रात चीनने रविवारी (ता.२३) ३९ लढाऊ विमाने (Warplanes) पाठवून घुसखोरी केली. गेल्या काही महिन्यांमध्ये चीनची ही सर्वात मोठी घुसखोरी मानले जात आहे. तैवान सरकारने यावर म्हटले की चीनकडून मोठ्या संख्येने लढाऊ विमाने पाठवण्यात आले होते.
चीनचे आक्रमक पाऊल
देशावर चीनकडून हल्ला होऊ शकतो, अशी शंका तैवानने (Taiwan) व्यक्त केली आहे. चीन तैवानवर हक्क सांगत आला आहे. दुसरीकडे तैवान नेहमी चीनचा दावा फेटाळत आला असून स्वतःला स्वातंत्र देश असल्याचे सांगत आला आहे. चीनची (China) आक्रमकता पाहिल्यास २०२१ च्या शेवटच्या महिन्यात तैवानच्या हवाई सुरक्षा क्षेत्रात घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. यात ४ ऑक्टोबर रोजी ५६ चिनी लढाऊ विमानांनी प्रवेश केला होता.(China Sends 39 Warplanes Into Taiwan Air Zone)
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी रात्री उशीरा म्हटले की चीनच्या ३९ लढाऊ विमानांना तैवानच्या हवाई क्षेत्रात दिसले. गेल्या वर्षानंतर ही दुसरी मोठी घुसखोरी आहे. घुसखोरीसाठी पाठवलेल्या या लढाऊ विमानांमध्ये २४, जे-१६ (J-16 Fighter Jets)आदींचा समावेश आहे. संरक्षण तज्ज्ञांनुसार हे विमान चिनी सरकारचे सर्वात खास लढाऊ विमानांमध्ये समावेश होतो. दुसरीकडे १०, जे-१० विमान आणि एक अणुबाॅम्ब डागण्यात सक्षम एच-६ बाॅम्बरही या ताफ्यात सामील होता. यातून स्पष्ट होते की चीन आपल्या आक्रमक वर्तनातून तैवानला इशारा देऊ इच्छित आहे. खरे पाहता चीन म्हणतो, की तैवानला आपल्या अधिकारी क्षेत्रात सामावून घेणार आहे. यासाठी भले शक्तीचा वापर करावा लागला तरी चालेल. (China-Taiwan Relation)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.